शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चांदी ! ‘ही’ कंपनी एका शेअरवर 150 रुपयांचा डिव्हीडेंट देणार, वाचा…

Page Industries Limited कंपनीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी कंपनी पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 150 रुपये लाभांश देणार आहे. कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करतानाच डिव्हिडंट देण्याची घोषणा केली.

Tejas B Shelar
Published:

Page Industries Limited Share Price : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी डिव्हीडेंट देण्याची घोषणा केली आहे. Page Industries Limited कंपनीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यावेळी कंपनी पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 150 रुपये लाभांश देणार आहे. कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करतानाच डिव्हिडंट देण्याची घोषणा केली. महत्त्वाची बाब म्हणजे या लाभांशाची रेकॉर्ड डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात लाभांशाची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. याआधीही सदर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अनेकवेळा लाभांश दिला आहे.

एका शेयरवर 150 रुपयांचा फायदा

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत पेज इंडस्ट्रीजने डिव्हिडंट देण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे ती आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 150 रुपये लाभांश देणार आहे. कंपनीकडून चालू आर्थिक वर्षातील हा तिसरा अंतरिम लाभांश राहणार आहे.

5 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीने सांगितले की लाभांशाची रेकॉर्ड तारीख 13 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचे नाव या तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना प्रत्येक शेअरवर 150 रुपये नफा मिळणार आहे.

स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती

डिव्हीडंट देण्याची घोषणा झाली असल्याने या कंपनीचा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. पण डिविडेंट देण्याची घोषणा झाल्यानंतरही शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 2.44 टक्क्यांच्या घसरणीसह 42912.40 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. नवीन वर्षात अगदी सुरुवातीपासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

या कालावधीत कंपनीचे स्टॉक 10 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. सात फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकची उच्च पातळी 44 हजार 222.95 इतके राहिली आणि निच्च पातळी 42 हजार 706 रुपये इतकी राहिली. याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 49,933.15 आणि निचाँक 33 हजार 100 इतका राहिला.

2024 मध्येही मिळाला होता डिविडेंट

मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये, कंपनीने 4 वेळा एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. कंपनीने चारही वेळा मिळून एका शेअरवर ७७० रुपये लाभांश दिला होता. गेल्या वर्षी, 16 फेब्रुवारी रोजी कंपनीने प्रथमच एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता.

त्यानंतर पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 100 रुपये लाभांश देण्यात आला आहे. त्याच वेळी, जेव्हा कंपनीने 16 ऑगस्ट रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. मग गुंतवणूकदारांना एका शेअरवर 300 रुपये नफा झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe