Hyundai New Suv : तुम्हीही नजिकच्चा भविष्यात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. Hyundai Motor India Limited (HMIL) ने नुकतीच एक SUV लाँच केली आहे. भारतीय कार मार्केटमध्ये ह्युंदाई कंपनीच्या अनेक SUV आपल्याला दिसतात. कंपनीच्या SUV गाड्या ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय देखील आहेत.
यात गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या एक्सटरचा सुद्धा समावेश होतो. दरम्यान याच लोकप्रिय SUV चे 2025 मॉडेल कंपनीकडून नुकतेच लॉन्च करण्यात आहे. कंपनीने या कारचे 2025 मॉडेल गुपचूप लॉन्च केले आहे आणि यामुळे सध्या या 2025 मॉडेलची जोरदार चर्चा सुरू आहे.
या नवीन मॉडेलमध्ये कंपनीकडून काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नव्या मॉडेलमध्ये अनेक फीचर्स अपडेट करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कंपनीला नवीन वैशिष्ट्यांसह ग्राहकांचा ड्रायव्हिंग अनुभव सुधारायचा आहे.
आता या कारमध्ये अद्ययावत प्रगत तंत्रज्ञान, उत्तम सुरक्षा आणि उत्तम कम्फर्ट मिळणार आहे. Exter ही कंपनीची तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. आता त्याची एक्स-शोरूम किंमत 773,190 रुपये आहे.
खरे तर ही गाडी लॉन्च झाल्यापासूनच चर्चेचा विषय असून या गाडीला ग्राहकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय. हेच कारण आहे की आता कंपनीने ही गाडी अपडेट केली आहे आणि नवीन व्हेरियंट सुद्धा ऍड करण्यात आले आहेत. आता आपण या गाडीच्या किंमती जाणून घेणार आहोत.
व्हेरियंटनुसार Exter च्या किंमती
Kappa Petrol S MT : सात लाख 73 हजार 190
Kappa Petrol S+ MT : 7,93,190
Kappa Petrol S AMT : 8,43,790
Kappa Petrol SX Tech MT : 8,51,190
Bi-fuel Kappa Petrol with Hy – CNG S Executive MT : 855,800
Kappa Petrol S+ AMT : 8 63 790
Bi-fuel Kappa Petrol with Hy – CNG Duo S Executive MT : 864,300
Bi-fuel Kappa Petrol with Hy – CNG Duo S+ Executive MT : 885,500
Kappa Petrol SX Tech AMT : 918,190
Bi-Fuel Kappa Petrol with HY-CNG DUO SX Tech MT : 953,390
कसे आहेत फिचर्स ?
Exeter Petrol आणि Hi-CNG Duo मध्ये नवीन SX Tech वेरियंटमधील पुश-बटण स्टार्ट/स्टॉपसह स्मार्ट की, ड्युअल कॅमेरासह डॅशकॅम, स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, बाय-फंक्शन प्रोजेक्टर हेडलॅम्प, 8-इंच टचस्क्रीन अँड्रॉइड डिस्प्ले आणि ऑटोमॅटिक टचस्क्रीन डिस्प्ले सिस्टीम आणि ऍपल टीसी डिस्प्ले ऑटोमॅटिक डिस्प्ले सिस्टीम आणि ऍपल ऑटोमॅटिक डिस्प्ले सिस्टीमसह ऑटोमॅटिक इन्फोटेनसह सुसज्ज आहे.
S+ पेट्रोल व्हेरियंट देखील अपग्रेड केले गेले आहे, आता स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, ड्युअल-टोन स्टाइल स्टील व्हील, स्टॅटिक मार्गदर्शक तत्त्वांसह मागील कॅमेरा, मागील AC व्हेंट्स आणि 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, S पेट्रोल प्रकार आता इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM), हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), स्टॅटिक मार्गदर्शक तत्त्वांसह रिअर पार्किंग कॅम आणि अपग्रेडेड इन्फोटेनमेंट आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह बाजारात आलाय.
CNG पॉवरट्रेनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, Hyundai ने CNG मध्ये S एक्झिक्युटिव्ह आणि S+ एक्झिक्युटिव्ह व्हेरियंट देखील सादर केले आहेत, जे खरेदीदारांसाठी किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय देतात.