सराफा बाजाराकडे निघताय ? मग आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या ! आता एका तोळ्यासाठी…….

आज, शनिवारी सोन्याच्या किंमतीत 10 ग्रॅममागे 160 रुपयांची वाढ झाली आहे, परंतु चांदीच्या दरामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही. नवीन दरानंतर, सोन्याच्या किंमती सुमारे 86,000 आणि चांदीचे दर सुमारे 1 लाखाच्या आसपास आहेत.

Tejas B Shelar
Published:

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या देशात लग्नसराईचा सीजन सुरु आहे तसेच येत्या काही दिवसांनी सणासुदीचा हंगाम देखील सुरू होणार आहे. म्हणून सध्या सोन्याच्या खरेदीचे नवीन विक्रम प्रस्थापित होत आहे. सोने खरेदीचा आलेख गेल्या काही दिवसांमध्ये वाढला आहे.

अशातच जर तुम्ही व्हॅलेंटाईन आठवड्याच्या प्रपोज डेच्या निमित्ताने सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की आज आपण 8 जानेवारी 2025 रोजीच्या सोने अन चांदीच्या सुधारित किंमती जाणून घेणार आहोत.

आज, शनिवारी सोन्याच्या किंमतीत 10 ग्रॅममागे 160 रुपयांची वाढ झाली आहे, परंतु चांदीच्या दरामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही. नवीन दरानंतर, सोन्याच्या किंमती सुमारे 86,000 आणि चांदीचे दर सुमारे 1 लाखाच्या आसपास आहेत. दरम्यान आता आपण देशातील प्रमुख शहरांमधील आजच्या सोन्याच्या किमती कशा आहेत? याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

आज शनिवारी बुलियन मार्केटने जाहीर केलेल्या गोल्ड सिल्व्हरच्या नवीन किंमतींनुसार, आज 8 फेब्रुवारी 2025 रोजी, 22 कॅरेट गोल्डची किंमत 79 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम , 24 कॅरेट सोन्याची किंमत 86, 820 प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65, 130 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नोंदवली गेली आहे.

तसेच चांदीची किंमत ही 99,500 रुपये प्रति किलो इतकी नमूद करण्यात आली आहे. मात्र सोन्याचा किमती या शहरानुसार बदलत असतात. अशा परिस्थितीत आता आपण शहरानुसार सोन्याचा सध्याच्या किमती जाणून घेऊयात.

शहरानुसार सोन्याच्या किंमती

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 490 रुपये नमूद करण्यात आली. मुंबईत आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार दहा रुपये एवढी होती.

दिल्ली : आज येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 600 रुपये नमूद करण्यात आली. इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 130 रुपये एवढी होती.

भोपाळ : आज येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 500 रुपये नमूद करण्यात आली. इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 50 रुपये एवढी होती.

कोलकाता : इथं आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 490 रुपये नमूद करण्यात आली. इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 10 रुपये एवढी होती. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe