विकेंडला मूवीसाठी चित्रपटगृहात जाण्याची गरज नाही! या विकेंडला OTT वर ‘हे’ वेबसीरीज अन चित्रपट होणार रिलीज

फेब्रुवारीच्या दुसऱ्या वीकेंडच्या आधी अनेक भन्नाट वेब सिरीज रिलीज करण्यात आल्या आहेत. यामुळे जर तुम्ही या विकेंडला तुमच्या परिवारासमवेत नवी वेब सिरीज पाहण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही या नव्याने लॉन्च झालेल्या वेब सिरीज वॉच आउट करू शकता.

Tejas B Shelar
Published:

Latest OTT Release February 2025 : विकेंड आला की आपण सर्वजण ओटीटी प्लॅटफॉर्म चेक करतो. कारण म्हणजे वीकेंडला अनेक नव्या वेब सिरीज रिलीज होत असतात. प्रत्येक वीकेंडला कुठले ना कुठली व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होते. दरम्यान जर या वीकेंडला तुम्हालाही नव्याने रिलीज झालेली वेब सिरीज बघायची असेल तर तुमच्यासाठी आजच आले कामाचा ठरणार आहे.

खरंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या वीकेंडच्या आधी अनेक भन्नाट वेब सिरीज रिलीज करण्यात आल्या आहेत. यामुळे जर तुम्ही या विकेंडला तुमच्या परिवारासमवेत नवी वेब सिरीज पाहण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही या नव्याने लॉन्च झालेल्या वेब सिरीज वॉच आउट करू शकता. आता आपण या वीकेंडला कोणकोणत्या वेब सिरीज तसेच चित्रपट रिलीज झाले आहेत आणि ते वेब सिरीज किंवा चित्रपट कुठे पाहता येतील? याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

वीकेंडला रिलीज झालेले चित्रपट

बडा नाम करेंगे : जर आपणास रोमांटिक वेब सिरीज पाहायला आवडत असेल तर बडा नाम करेंगे तुमच्यासाठीच बनवण्यात आली आहे असे म्हणा. ही वेब सिरीज काल रिलीज झाली असून या वीकेंडसाठी ही वेब सिरीज एक बेस्ट पर्याय ठरणार आहे. ही Web Series Sooraj R Barjatya यांनी बनवली आहे. ही एक रोमँटिक ड्रामा असणारी सीरीज आहे.

यामध्ये, दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येणारे लोक हजारो अडचणींमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडतात. या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आलेले रोमँटिक सीन आणि फिलिंग्स तुम्हाला नक्कीच आनंद देणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत ही वेब सिरीज पाहू शकता. Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही वेब सिरीज पाहता येणार आहे.

The Mehta Boys : आपणास कॉमेडी जॉनर मधील वेब सिरीज पाहणे आवडत असेल तर द मेहता बॉईज हा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. द मेहता बॉईज ही एक विनोदी वेब सीरीज आहे. ही वेब सीरीज वडिलांच्या अन मुलाच्या जोडगोळी भोवतीच फिरताना दिसते.

हे दोघे एकमेकांच्या जवळ कसे येतात आणि त्यांच्यात असणारे मतभेद ते कसे दूर करतात? हे दाखवणारी ही वेब सिरीज फारच भन्नाट आहे. या वेब सिरीज च्या स्टोरी मध्ये दम आहे. याचे दिग्दर्शन बोमन इराणी यांनी केले आहे. तुम्ही ही वेब सिरीज तुमच्या परिवारासमवेत पाहायला हवी. काल ही वेब सिरीज रिलीज झाली असून अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही या वेब सिरीजचा आनंद घेऊ शकता.

Mrs : Mrs ही अशी वेब सिरीज आहे जी तुम्ही या वीकेंडला नक्कीच बघायला हवी. तुम्ही तुमच्या परिवारासमवेत ही वेब सिरीज पाहू शकता. यामध्ये एका महिलेच्या जीवनाची प्रेरणादायक कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही एक प्रेरणादायी अन एक पावरफुल ड्रामा असणारी भन्नाट वेब सिरीज आहे.

या वेब सिरीज मध्ये एका महिलेच्या जीवन प्रवासाला दाखवण्यात आले आहे, ही महिला लग्न झाल्यानंतर कशा पद्धतीने पुन्हा पुनरस्थापित होते हेच आपल्याला या सिरीज मध्ये पाहायला मिळते. ही वेब सिरीज काल रिलीज झाली आहे. 7 फेब्रुवारीपासून ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ZEE 5 या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही वेब सिरीज पाहता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe