Multibagger Stocks : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही स्टॉक मधून चांगला जोरदार परतावा मिळतो तर काही स्टॉक मधून त्यांना नुकसानही सहन करावे लागते. खरंतर शेअर मार्केटमध्ये असे काही मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या काही वर्षातच करोडपती बनवले आहे. जर असा एखादा मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये राहिला तर गुंतवणूकदार नक्कीच करोडपती होणार आहेत.
म्हणून गुंतवणूकदार नेहमी अशा मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असतात. दरम्यान आज आपण अशा एका स्टॉकची माहिती पाहणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना पाच वर्षातच करोडपती बनवलय. या स्टॉकने फक्त एका लाखाच्या गुंतवणुकीतुन गुंतवणूकदारांना चार कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
![Multibagger Stocks](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Multibagger-Stocks.jpeg)
महत्त्वाचे म्हणजे सध्या हा स्टॉक शेअर बाजारात 20 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. नक्कीचं आता तुम्हाला या स्टॉकची अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोणता आहे तो स्टॉक
आम्ही ज्या स्टॉक बाबत बोलत आहोत तो आहे राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचा. या कंपनीबाबत बोलायचं झालं तर या कंपनीची सुरुवात 1993 मध्ये झाली. राज रेयन इंडस्ट्रीज लिमिटेड सिल्वासामध्ये सुरू झाली. ही कंपनी पॉलिस्टर चिप्स आणि विविध प्रकारचे पॉलिस्टर, प्रक्रिया केलेले सूत तयार करते आणि याचा व्यापार करते.
कंपनीच्या उत्पादनांमध्ये कॉटनकट, फायर-रेझिस्टंट, अँटी-मायक्रोबियल, ऑक्टा-लोबल थ्रेड, फुल डल, सेमी-डल, डोप-डाईड यार्न, मायक्रो फिलामेंट्स आणि इंट्रामिंग यार्न यांचा समावेश आहे.
ऑगस्ट 2010 पर्यंत कंपनीचे नाव राज रेयॉन लिमिटेड असे होते, पण ऑगस्ट २०१० मध्ये याचे नाव राज रेयन इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये बदलले गेले आहे. राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड आपली उत्पादने स्पेन, पोलंड, सिरिया, ब्राझील, चिली, कोलंबिया, इजिप्त, इराण, मेक्सिको, मोरोक्को, पेरू, व्हिएतनाम आणि थायलंड यासारख्या देशांना सुद्धा पाठवते.
म्हणजे ही कंपनी जागतिक बाजारातही व्यवसाय करत आहे. या कंपनीच्या स्टॉकने गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलाय खरा पण, त्रैमासिक निकालात कंपनीला 3.48 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, वार्षिक आधारावर त्याचा महसूल 32.12% वाढला आहे.
राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सची स्थिती कशी आहे?
मार्च 2023 मध्ये, हा स्टॉक 84.65 रुपयांच्या उच्चांक पर्यंत पोहोचला होता, मात्र ही उच्चांक पातळी जास्त काळ टिकली नाही. सध्या हा स्टॉक २० रुपयांवर व्यापार करीत आहे, ही पातळी त्याच्या उच्च पातळीपेक्षा जवळपास 76% खाली आहे. मात्र दीर्घ मुदतीमध्ये जबरदस्त परतावा देणारा हा स्टॉक अल्पावधीत काही विशेष कामगिरी करू शकला नाही. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 13% खाली आला आहे. तसेच गेल्या एका वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना तीन टक्के परतावा दिला आहे.
पाच वर्षात बनवलं करोडपती
या स्टॉकने गेल्या पाच वर्षात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. गेल्या 5 वर्षांत राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या स्टॉकची किंमत 5 पैशांनी वाढून 20 रुपयांवर पोहचली आहे. या काळात गुंतवणूकदारांना सुमारे 39,960% परतावा मिळाला आहे.
म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ही रक्कम आतापर्यंत होल्ड केली असेल तर आज त्याचे मूल्य सुमारे 4 कोटी रुपयांपर्यंत वाढले असेल.