Change In FASTag Rule:- भारत सरकार लवकरच FASTag प्रणालीत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे वारंवार टोल रिचार्ज करण्याच्या त्रासातून वाहनचालकांची सुटका होणार आहे. सध्या महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील टोल भरण्यासाठी FASTag अनिवार्य आहे.
मात्र अनेक वाहनचालकांना वारंवार FASTag रिचार्ज करण्याची अडचण येत असल्याने सरकार नवीन टोल पास प्रणाली सुरू करण्याच्या विचारात आहे. ही नवीन प्रणाली खासगी वाहनांसाठी मासिक, वार्षिक आणि आजीवन टोल पासच्या स्वरूपात असणार आहे. या बदलामुळे टोल प्लाझांवरील वाहतूक अधिक सुकर होईल.लांबच लांब रांगा कमी होतील आणि वाहनचालकांना प्रत्येक वेळी टोल भरावा लागणार नाही.
![new fasttag rule](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/fasttag.jpg)
काय आहे नवीन प्रस्ताव?
नव्या प्रस्तावानुसार सरकार एका वर्षासाठी टोल पास उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.ज्याची किंमत सुमारे ३,००० रुपये असू शकते. याशिवाय ३०,००० रुपये एकदाच भरल्यास आजीवन टोल पास मिळू शकतो.ज्यामुळे पुढील १५ वर्षांसाठी टोल भरण्याची गरज भासणार नाही.
याचा थेट फायदा राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर सतत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना होईल. कारण त्यांना टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही. या टोल पास प्रणालीला FASTagच्या विद्यमान यंत्रणेशी जोडले जाईल. त्यामुळे नवीन उपकरणे बसवण्याची किंवा अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागणार नाही.
मंत्री नितीन गडकरींनी दिले होते संकेत
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारी २०२५ मध्ये या योजनेबद्दल संकेत दिले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील आकडेवारीनुसार भारत सरकारला खासगी वाहनांमधून ५३% टोल उत्पन्न मिळाले आहे.
त्यामुळे टोल पास प्रणाली लागू केल्यास टोल वसुली अधिक सुलभ होईल. या नव्या प्रणालीमुळे वाहनचालकांचा प्रवास वेगवान आणि अडथळारहित होईल.कारण टोल प्लाझांवर थांबण्याची गरज भासणार नाही.
सरकारच्या या नव्या नियमानुसार FASTag वापरणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वारंवार FASTag रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि महामार्गांवरील वाहतूक अधिक गतिमान होईल.
जर ही योजना लागू झाली तर टोल भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि देशभरातील वाहनचालकांचा प्रवास अधिक सुकर आणि अडथळारहित होईल.