BHEL Share Price : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थातच भेल कंपनीच्या बाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. खरंतर या कंपनीचे तिमाही निकाल नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कंपनीचे तिमाही निकाल सकारात्मक असून यामध्ये कंपनीचा प्रॉफिट दुपटीने वाढला असल्याचे दिसले आहे.
महत्त्वाचे म्हणजे जबरदस्त कामगिरीचे तिमाही निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर आता या सरकारी कंपनीसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. या सरकारी कंपनीला नुकतेच 8,000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली असून यामुळे या कंपनीचे शेअर्स बाजारात पुन्हा एकदा फोकस मध्ये आले असून आगामी काळात स्टॉकच्या किमती वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
![BHEL Share Price](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/BHEL-Share-Price.jpeg)
यामुळे गुंतवणूकदार या स्टॉकच्या खरेदीसाठी इच्छुक दिसत असून आगामी काळात या स्टॉकची खरेदी वाढणार असल्याचे दिसते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने स्वतः या ऑर्डरची माहिती दिली आहे. शनिवारी भारत सरकारच्या मालकीच्या या सरकारी कंपनीने सांगितले की, त्यांनी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) कडून 8,000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे.
हा करार कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या बीटीजी (बॉयलर टर्बाइन जनरेटर) पॅकेजसाठी असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात उपकरणांचा पुरवठा, बांधकाम आणि नागरी कामांचा समावेश आहे. या वीज केंद्राची क्षमता 1320 मेगावॅट इतकी आहे.
दोन दिवसांपूर्वी अर्थातच 7 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर जिल्ह्यातील कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या BTG पॅकेजसाठी BHEL ला Mahagenco कडून ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ (LOA) प्राप्त झाले. LOA च्या तारखेपासून 52-58 महिन्यांत हा करार पूर्ण होणे अपेक्षित आहे. आता आपण तिमाही निकालात कंपनीला नेमका किती प्रॉफिट झाला होता हे पाहूयात.
कंपनीला कितीचा प्रॉफिट झाला?
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत BHEL चा निव्वळ नफा दुपटीने वाढून 134.70 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कॉम्प आर्टिकलमध्ये असे म्हटले आहे की त्याचे उत्पन्न वाढल्यामुळे त्याचा नफा वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 60.12 कोटी रुपये होता.
या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 7,385 कोटी रुपये राहिले, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5,599.63 कोटी रुपये होते. आता आपण या स्टॉकबाबत विश्लेषकांनी काय म्हटले आहे? हे जाणून घेऊयात.
स्टॉक मार्केट विश्लेषक काय म्हणतात?
BHEL च्या शेअर्स बाबत बोलायचे झाले तर या कंपनीचे स्टॉक गेल्या बारा महिन्यांपासून बाजारात फारशी चांगली कामगिरी करत नाहीयेत. हा स्टॉक शुक्रवारी 1.19% घसरून ₹ 202.41 वर बंद झाला. पण अलीकडील काही दिवस या स्टॉकसाठी फायद्याचे ठरले आहेत, 2025 मध्ये आतापर्यंत या स्टॉकमध्ये 13% वाढ झाली आहे.
मात्र 12 महिन्यांच्या कालावधीत या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला 12% नकारात्मक परतावा दिला आहे. CLSA ने BHEL वर ‘अंडरवेट’ रेटिंगसह आपली लक्ष्य किंमत म्हणजेच टारगेट प्राईस कमी केले आहे, तर मॉर्गन स्टॅनलीने ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवत या स्टॉक साठी 352 रुपयांची टारगेट प्राईज ठेवण्यात आली आहे.