Bonus Share 2025 : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि अगदीच कामाची बातमी समोर येत आहे. विशेषतः बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे. कारण अशा गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी आता उपलब्ध झाली आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत तर काही कंपन्यांकडून डिव्हीडंट म्हणजेच लाभांश देण्याची घोषणा केली जात आहे, तर काही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट सुद्धा देत आहेत.
![Bonus Share 2025](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Bonus-Share-2025-3.jpeg)
दरम्यान शेअर बाजारात सूचीबद्ध असणारी Richfield Financial Services Ltd कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीकडून गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनी या आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कंपनीने बोनस शेअर साठी रेकॉर्ड काय ठरवली आहे, सध्या हा स्टॉक शेअर मार्केटमध्ये कसा परफॉर्म करतोय? याचाच सविस्तर आढावा घेणार आहोत.
बोनस शेअर्ससाठीची रेकॉर्ड
रिचफिल्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने या आधी आपल्या गुंतवणूकदारांना कधीच बोनस शेअर दिलेला नाही. म्हणजेच कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअरची भेट देणार आहे. परंतु या आधी कंपनीने गुंतवणूकदारांना डिव्हिडंट म्हणजेच लाभांश दिला आहे.
जुलै 2024 मध्ये या कंपनीने एका शेअरवर 0.80 रुपयांचा डिव्हीडंट दिला होता. दरम्यान आता पहिल्यांदाच कंपनीकडून बोनस शेअर दिला जाणार असून याबाबत कंपनीने अधिकची माहिती देताना असे सांगितले होते की पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरमागे 1 बोनस शेअर म्हणून दिला जाईल.
या बोनसची रेकॉर्ड डेट कंपनीने जाहीर केली आहे, बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट 14 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांची नावे या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहतील त्यांना बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे.
स्टॉक मार्केटमध्ये कंपनीची स्थिती कशी?
खरंतर कंपनीकडून बोनस शेअरची घोषणा करण्यात आली असली तरी देखील गेल्या आठवड्याभरापासून या शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2 टक्क्यांनी घसरले होते. त्यानंतर बीएसईमध्ये शेअरची किंमत 108.50 रुपयांच्या पातळीवर आली.
गेल्या आठवडाभरात कंपनीचे शेअर्स 0.46 टक्क्यांनी घसरलेत. मात्र गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सची किंमत 400 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्च पातळी 132.67 रुपये आणि 52 आठवड्यांची निम्न पातळी 22.12 रुपये आहे.