Bonus Share 2025 : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक कामाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अजूनही अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत तसेच काही कंपन्यांकडून गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी डिव्हीडंट म्हणजेच लाभांश देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. दरम्यान जे गुंतवणूकदार बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांवर दाव लावतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

मायक्रो कॅप फार्मास्युटिकल कंपनी मुरे ऑर्गनायझर लवकरच बोनस शेअर देणार आहे. यामुळे कंपनीचे शेअर्स येत्या काही दिवसांत फोकसमध्ये येऊ शकतात. कंपनी आपल्या भागधारकांसाठी दुहेरी भेटवस्तू जाहीर करण्यास तयार आहे.
मरे ऑर्गनायझरचा शेअर गेल्या शुक्रवारी 1.77 रुपयांवर बंद झाला होता. येथे, कंपनीने डिसेंबर तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. समीक्षाधीन तिमाहीत, मायक्रो कॅप फार्मा फर्मने Q3FY25 निव्वळ नफा 10,000 टक्क्यांनी वाढून रु. 4.01 कोटींवर गेल्याची नोंद केली आहे, जो मागील वर्षीच्या कालावधीत 3.65 लाख होता.
मंडळी अजून या कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केलेली नाही मात्र लवकरच याबाबत कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा होणार आणि बोनस शेअर देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या स्मॉल कॅप कंपनीने शुक्रवारी माहिती दिली की, सध्याच्या इक्विटी भागधारकांना बोनस इक्विटी शेअर्स देण्याच्या प्रस्तावावर आणि इक्विटी शेअर्सच्या उपविभागावर चर्चा करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी कंपनीच्या बोर्ड सदस्यांची गुरुवार, 13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता बैठक होणार आहे.
मरे ऑर्गनायझरने 2021 मध्ये बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटची शेवटची घोषणा केली होती. आता आपण या कंपनीच्या स्टॉकची शेअर बाजारातील स्थिती नेमकी कशी आहे याची माहिती पाहूयात.
कशी आहे शेअर बाजारातील परिस्थिती
या फार्मा कंपनीच्या शेअर्सबाबत बोलायचं झालं तर सध्या हे स्टॉक 5 रुपयांच्या खाली व्यवहार करत आहेत आणि शुक्रवारी ते 1.77 रुपयांवर बंद झाले होते.
बीएसई ॲनालिटिक्सनुसार, मरे ऑर्गनायझरचा स्टॉक गेल्या एका आठवड्यात 14 टक्क्यांहून अधिक घसरला आहे, तर गेल्या दोन आठवड्यांत तो सुमारे 6 टक्क्यांनी घसरला आहे. तथापि, गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 26.43 टक्के वाढला आहे.