सोन्याच्या किमती विना GST 85 हजार पार ! Gold च्या किंमतीचा नवा विक्रम, भाव वाढ होण्याचे कारण काय ?

सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा सीजन सुरू आहे आणि अशा परिस्थितीत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे सोन्याच्या खरेदीचा नवीन आलेख तयार होतोय तर दुसरीकडे किमतींमध्ये सतत वाढ होत आहे. आजही सोन्याच्या दराने नवा इतिहास रचला आहे.

Published on -

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या या मौल्यवान धातूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला नव्याने सोने खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाचे राहणार आहे. सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा सीजन सुरू आहे आणि अशा परिस्थितीत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

एकीकडे सोन्याच्या खरेदीचा नवीन आलेख तयार होतोय तर दुसरीकडे किमतींमध्ये सतत वाढ होत आहे. आजही सोन्याच्या दराने नवा इतिहास रचला आहे. जीएसटीशिवाय 24 कॅरेट सोन्याची किंमत आता 85368 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली आहे.

आज, सोमवार, 10 फेब्रुवारी रोजी सोने 669 रुपयांनी महागले आणि 85,368 रुपयांवर पोहचले. दुसरीकडे आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सराफा बाजारात आज चांदी ४५१ रुपयांनी स्वस्त होऊन ९४९४० रुपये किलो इतकी झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात आणि सोने एक लाखाचा टप्पा पार करू शकते असे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण सोन्याच्या किमती वाढण्याचे नेमके कारण काय आहे याचा एक आढावा घेणार आहोत.

IBJA दरांनुसार, आज 23 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 666 रुपयांनी महाग होऊन 85,062 रुपयांवर पोहोचली आहे. 22 कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत आता 78197 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64026 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली आहे. त्याच वेळी, 14 कॅरेट सोन्याचा भाव आता 49940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तसेच 24 कॅरेट सोन्याची किंमत आता 85368 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली आहे. मात्र सोन्याच्या या किमती जीएसटी शिवाय आहेत. जीएसटी पकडल्यानंतर या किमती आणखी एक ते दोन हजार रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. आता आपण सोने महाग होण्याचे नेमके कारण काय? याचा आढावा घेऊयात.

सोने महागण्याचे कारण

आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीही विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचल्यात कारण ट्रम्प यांनी नवीन शुल्क लादण्याच्या निर्णय घेतलाय अन त्यामुळे ग्लोबल ट्रेड वॉरची चिंता वाढली. गेल्या शुक्रवारी, 7 फेब्रुवारी रोजी स्पॉट गोल्डने 2,886.62 डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला.

ट्रम्प यांनी सांगितले की, विद्यमान मेटल टॅरिफ व्यतिरिक्त ते सोमवारी अमेरिकेतील सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर नवीन 25 टक्के शुल्क जाहीर करतील. अहवालात पुढे म्हटले आहे की या आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपर्यंत अनेक देशांवर परस्पर शुल्क जाहीर करण्याची त्यांची योजना आहे.

भू-राजकीय अनिश्चिततेच्या काळात सोन्याचे भाव वाढलेत. ट्रम्पच्या धोरणांमुळे अमेरिकेत महागाई आणखी वाढू शकते, याचा अर्थ यूएस फेड लवकरच दर कमी करणार नाही. जागतिक घटकांव्यतिरिक्त, रुपयातील कमजोरीमुळेही देशांतर्गत सोन्याच्या किमतीत वाढ झाली असल्याचा दावा जानकरांनी केला आहे.

भारतीय रुपया सोमवारी विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तो 49 पैशांनी घसरून 87.92 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आलाय जो शुक्रवारी प्रति डॉलर 87.43 वर बंद झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News