NHPC Share Price : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांनी सरकारी कंपनी एन एच पी सी च्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. PSU कंपनी NHPC चे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत.
आज 10 फेब्रुवारी 2025 रोजी सोमवारी ट्रेडिंग दरम्यान या कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये राहिला. आज कंपनीचा स्टॉक 3% घसरून इंट्राडे नीचांकी किंमतीवर म्हणजे 75.33 वर आला. शेअर्सच्या या घसरणीचे कारण डिसेंबर तिमाहीचे निकाल असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहेत.
![NHPC Share Price](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/NHPC-Share-Price.jpeg)
वास्तविक, जलविद्युत कंपनी NHPC चा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 47 टक्क्यांनी घसरून 330.13 कोटी रुपयांवर आला आहे. खर्च वाढल्याने कंपनीचा नफा कमी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 623.28 कोटी रुपये होता.
NSE वर उपलब्ध असलेल्या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, हा शेअर भारताच्या राष्ट्रपतींच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये भारताच्या राष्ट्रपतींचा 67.40 टक्के मोठा हिस्सा आहे. हे सुमारे 677 कोटी शेअर्स आहे.
सध्या कंपनीच्या स्टॉक मध्ये घसरण होत आहे मात्र स्टॉक मार्केट विश्लेषकांनी आगामी काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना चांगली कमाई होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हा स्टॉक 75 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय मात्र लवकरच याच्या किमती शंभर रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
जेएम फायनान्शिअल या ब्रोकरेज हाऊसने एन एच पी सी कंपनीसाठी सकारात्मक आउट लुक दिला असून कंपनीचा नफा कमी झालेला असतानाही तिमाही निकालानंतर या ब्रोकरेज कडून सदर कंपनीसाठी बाय रेटिंग कायम ठेवण्यात आली आहे. या कंपनीने या स्टॉक साठी 100 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित केले आहे.
म्हणजेच सध्याच्या किमती पेक्षा या स्टॉक मध्ये आणखी 25 रुपयांपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी डिव्हीडंट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आधीच हा स्टॉक फोकस मध्ये आहे आणि आता स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या स्टॉकच्या किमती आगामी काळात वाढणार असल्याचे म्हटले आहे.
डिव्हीडंट किती मिळणार?
कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्यावर 14 टक्के दराने अंतरिम लाभांश देण्यासही मान्यता दिली. अंतरिम लाभांश देण्यासाठी भागधारकांची पात्रता तपासण्याच्या उद्देशाने बोर्ड सदस्याने 13 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे.
NHPC शेअरची सध्याची शेअर बाजारातील परिस्थिती
हा PSU स्टॉक गेल्या वर्षी दबावाखाली होता आणि तो गेल्या बारा महिन्यांच्या काळात जवळपास 25 टक्क्यांनी घसरला आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 118.45 अन 52 आठवड्यांचा नीचांक 72.19 इतका आहे. मासिक स्केलवर, गेल्या वर्षी ऑगस्टपासून स्टॉक खाली ट्रेंड करत आहे. मात्र आगामी काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.