Share Market मधील घसरणीच्या काळातही ‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत! शेअर खरेदीसाठी प्रचंड गर्दी

या कंपनीचे शेअर्स आज सोमवारी 10 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान फोकसमध्ये राहिलेत. आज कंपनीच्या शेअर्सने 20% च्या अप्पर सर्किटला धडक दिली आणि शेअरने इंट्राडे उच्चांक 9.55 रुपये गाठला.

Tejas B Shelar
Published:

Penny Stocks : आयटी सेक्टर मधील सर्विस कंपनी वामा इंडस्ट्रीज लिमिटेड पुन्हा एकदा फोकस मध्ये आली आहे. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली. मात्र असे असतानाही आज आयटी मधील सर्विस कंपनी वामा इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

या कंपनीचे शेअर्स आज सोमवारी 10 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान फोकसमध्ये राहिलेत. आज कंपनीच्या शेअर्सने 20% च्या अप्पर सर्किटला धडक दिली आणि शेअरने इंट्राडे उच्चांक 9.55 रुपये गाठला.

यामुळे आज गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हा स्टॉक खरेदी करण्यासाठी सध्या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ पाहायला मिळत आहे.

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे कंपनीचे तिमाही निकाल हे फारच सकारात्मक राहिले आहेत आणि हेच कारण आहे की या स्टॉकच्या खरेदीसाठी आत्ता प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी हा स्टॉक 7.96 रुपयांवर क्लोज झाला होता.

मात्र आता हा स्टॉक 9.55 वर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये या वाढीचे कारण डिसेंबर तिमाहीचे उत्कृष्ट निकालचं आहेत, तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये असून याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

खरं तर, चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने तब्बल 4,050% नफा कमावला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 50.18 कोटी रुपये झाले आहे.

यामुळे आज शेअर बाजारात पडझड होत असताना सुद्धा या शेअर्सची कामगिरी शानदार राहिली आहे आणि आज म्हणूनच आज आपण या कंपनीच्या तिमाही निकालाची माहिती जाणून घेणार आहोत.

कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत?

डिसेंबर तिमाहीत कंपनीने 55.42 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे. हे वार्षिक आधारावर 2,833% अधिक आहे. यापूर्वी, मागील तिमाहीत कालावधीत त्याचे उत्पन्न वार्षिक 1.89 कोटी रुपये होते. त्याच वेळी, तिमाही-दर-तिमाही महसूल 1,627% वाढला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने 3.21 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe