Reliance Infrastructure Ltd : अनिल अंबानीच्या कंपनीची सध्या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे या कंपनीचे शेअर्स गेल्या काही दिवसात शेअर बाजारात तेजीत आले आहेत.
या कंपनीचे स्टॉक सध्या फोकस मध्ये असून गुंतवणूकदार याकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. हा स्टॉक खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी होत आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 7% ने वाढून रु. 288.80 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. गुरुवारी या स्टॉकची क्लोजिंग प्राईस ही 272.05 इतकी होती.
![Reliance Infrastructure Ltd](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Reliance-Infrastructure-Ltd.jpeg)
खरंतर कंपनीकडून नुकतेच आपले तिमाही निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या विविध कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत.
काही कंपन्या तिमाही निकाल जाहीर करण्याबरोबरच गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट देत आहेत शिवाय डिव्हीडंट ची देखील घोषणा केली जात आहे. दरम्यान रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सुद्धा डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे तिमाही निकाल जाहीर होण्याच्या आधीच या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आला असून याच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स 1180% वर चढले आहेत. या काळात त्याची किंमत 22 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत म्हणजेच 288.80 रुपयांपर्यंत वाढली आहे.
म्हणजेच अजून कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झालेले नाहीत तरीही या स्टॉकच्या किमतीत वाढ झाली आहे. दरम्यान आता आपण तिमाही निकालाबाबत कंपनीने नेमके काय म्हटले आहे याबाबत माहिती पाहूयात.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड काय म्हणते?
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बीएसईला कळवले आहे की, कंपनीच्या बोर्ड सदस्यांची बैठक 13 फेब्रुवारी 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे.
यामध्ये, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे अनऑडिट केलेले आर्थिक निकाल (स्टँडअलोन आणि एकत्रीत दोन्ही) विचारात घेतले जातील आणि मंजूर केले जातील.
पुढे बोलतांना रिलायन्स इन्फ्रा ने माहिती दिली आहे की, कंपनीच्या सिक्युरिटीज मध्ये ट्रेडिंग विंडो बुधवार, 01 जानेवारी 2025 पासून बोर्ड मीटिंगचे निकाल सार्वजनिक झाल्यानंतर 48 तास संपेपर्यंत बंद राहणार आहे.
एकंदरीत तिमाही निकाल जाहीर होण्याच्या आधीच अनिल अंबानीच्या कंपनीचे स्टॉक तेजीत आले आहेत, पण तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीची कामगिरी कशी राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.