Realme GT Pro Racing Edition फक्त 35000 मध्ये फ्लॅगशीप फोन !

Tejas B Shelar
Published:

Realme Smartphone :- Realme GT 7 Pro Racing Edition हा स्मार्टफोन 13 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे लाँच होणार आहे. कंपनीने याची अधिकृत घोषणा केली असून हा फोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणार आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्तरावरील परफॉर्मन्स देणारा असूनही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये Snapdragon 8 Elite हा अत्यंत वेगवान आणि पॉवरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे.जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

Realme GT 7 Pro डिस्प्ले

याच्या डिस्प्लेबाबत बोलायचे झाले तर 6.78-इंचाचा 1.5K LTPO OLED स्क्रीन दिला जाईल.जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. हा डिस्प्ले 8T LTPO मायक्रो क्वाड-कर्व्ड तंत्रज्ञानासह येईल. ज्यामुळे उत्तम व्हिज्युअल अनुभव मिळेल. फोनमध्ये LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेज प्रकार देण्यात आला आहे. ज्यामुळे डेटा लोडिंग आणि प्रोसेसिंग वेगवान होईल. हा फोन Android 15 वर चालणार असून, नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सुरक्षेसाठी परिपूर्ण असेल.

Realme GT 7 Pro डिझाईन 

डिझाइनच्या बाबतीत Realme GT 7 Pro Racing Edition दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल – “नेपच्यून एक्सप्लोरेशन” आणि “स्टार ट्रेल टायटॅनियम”. हे डिव्हाईस विशेष “Zero-degree Storm AG” प्रोसेस वापरून तयार करण्यात आले आहे.ज्यामुळे त्याला प्रीमियम आणि युनिक टेक्श्चर मिळते. फोनच्या मागील बाजूस नवीन प्रकारचा पोत दिसून येईल. जो त्याला अधिक आकर्षक लूक देईल. त्याच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP + 8MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल तर 16MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी दिला जाणार आहे.

Realme GT 7 Pro बॅटरी?

बॅटरी आणि चार्जिंग तंत्रज्ञान हे या स्मार्टफोनचे आणखी एक वैशिष्ट्य असेल. यात 6500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. यामुळे फोन अवघ्या काही मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल. Realme GT 7 Pro Racing Edition च्या डिझाइनमध्ये मेटल फ्रेमचा वापर करण्यात आला असून त्याची जाडी 8.55mm आणि वजन 210 ग्रॅम असेल. यामध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे, जो अधिक वेगवान आणि सुरक्षित असेल.

Realme GT 7 Pro किंमत

Realme GT 7 Pro Racing Edition ची किंमत अद्याप उघड करण्यात आलेली नाही. परंतु तो 35,000 – 40,000 रुपयांच्या श्रेणीत लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा सेटअप, प्रीमियम डिझाइन आणि मोठी बॅटरी यासारखी वैशिष्ट्ये दिली गेली असल्याने हा फ्लॅगशिप किलर ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe