११ फेब्रुवारी २०२५ पारनेर : कुकडी प्रकल्पातील येडगांव धरणातून निघोज व परिसरातील १४ गावांना कालव्याद्वारे पाणी दिले जाते. डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या तारखा निश्चित करण्यात येत असून त्यानुसार हे आवर्तन २० फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र पीकांना पाण्याची आवष्यकता असल्याने हे आवर्तन आगोदर सोडण्याची मागणी निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे केली होती.
उन्हाळयाच्या पार्श्वभुमीवर पिकांना पाण्याची जास्त आवष्यकता असून पाणी न मिळाल्यास शेतांमधील उभी पिके जळून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आ. काशिनाथ दाते यांनी आवर्तनाआगोदर पाच दिवस पाणी सोडण्याची मागणी शिर्डी येथे सहकार परिषदेमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे केली होती.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-60.jpg)
आ. दाते यांच्या या मागणीची मंत्री विखे यांनी तात्काळ दखल घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता धुमाळ यांच्याशी संपर्क करून १५ फेब्रुवारी रोजी आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. पाच विवस अगोदर आवर्तन सोडण्यात येणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे तसेच आमदार काशिनाथ वाते यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.