… अन्यथा महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर जनावरे सोडणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- शहरामध्ये मोकाट कुत्रे व जनावरांचा प्रश्न हा नेहमीचाच झालेला आहे. अनेकदा पालिकेने मोहीम हाती घेतली परंतु यातून निष्पन्न मात्र काही झाले नाही.

अनेक संघटनांनी वेळोवेळी याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली परंतु यावर काही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

दरम्यान, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी येत्या आठ दिवसांमध्ये मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त न केल्यास आयुक्तांच्या दालनासमोर मोकाट जनावरे सोडविण्यात येतील, असा इशारा दिला आहे.

याप्रकरणी बारस्कर यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहर व परिसरात सकाळी नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात.

तसेच औद्योगिक वसाहतीत रात्री कामगार जात असतात. त्यांच्यावर कुत्रे हल्ले करत असून यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोंडवाडा विभागाकडून मोकाट कुत्रे व जनावरे पकडण्याचे काम यापूर्वी केले जात होते. परंतु, अलिकडे जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. यामुळे आठ दिवसामध्ये मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा बारस्कर यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment