Business Idea : अगरबत्तीला आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगरबत्ती अन धूपबत्ती ही सर्वच घरांमध्ये वापरली जाते. देवाची प्रार्थना करताना अगरबत्ती लावतात. म्हणून जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करा शकता. हा भारतातील एक लोकप्रिय व्यवसाय आहे, जो कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो आणि चांगला नफा देणारा ठरू शकतो.
मंदिरे, घरे, कार्यालये आणि धार्मिक कार्यांसाठी अगरबत्तीची मागणी कायम राहते म्हणूनच हा व्यवसाय बारा महिने चालतो आणि या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करता येते. दरम्यान आता आपण या व्यवसायाची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
![Business Idea](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Business-Idea.jpeg)
अगरबत्ती व्यवसायाची संधी आणि मागणी
आपल्या भारतात तर अगरबत्तीला मागणी आहेच शिवाय परदेशात सुद्धा अगरबत्तीला मोठी मागणी आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये याचा नेहमीचं उपयोग केला जातो. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी गुंतवणुकीत उत्पादन सुरू करता येते. सुगंधित अगरबत्तींची निर्यातही चांगली होते. म्हणून तुम्ही सुगंधित अगरबत्ती तयार करून हा व्यवसाय चांगला ग्रो करू शकता.
व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल
बांबू काड्या – अगरबत्तीचा आधार
कोळसापुड (चारकोल पावडर) – जळण्यास मदत करणारे
सुपारी पावडर / जिगट पावडर – बांधण्यास मदत करणारे
सुगंधी तेल (परफ्युम) – सुगंधासाठी
डीपिंग तेल (डायप्थलाइट / सॉल्व्हंट्स) – परफ्युम टिकवण्यासाठी
रंगद्रव्ये – आकर्षक दिसण्यासाठी
पॅकिंग साहित्य – विक्रीसाठी आकर्षक पॅकेजिंग
अगरबत्ती बनवण्याची प्रक्रिया
अगरबत्ती दोन प्रकारे तयार करता येते. यातील पहिली पद्धत म्हणजे अगरबत्ती हाताने तयार करता येते. घरगुती उत्पादनासाठी तुम्ही हाताने अगरबत्ती तयार करू शकता. हाताने अगरबत्ती तयार केल्यास तुम्ही तुमचा व्यवसाय अगदी छोट्या स्तरावर सुरू करून पुढे भविष्यात मशीन घेऊन हा व्यवसाय विस्तारू शकता. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही अगरबत्ती मशीन द्वारे तयार करू शकता. अगरबत्ती बनवण्याच्या मशीन ऑटोमॅटिक सुद्धा असतात आणि सेमी ऑटोमॅटिक सुद्धा असतात. आता आपण अगरबत्ती नेमकी कशी तयार होते हे जाणून घेऊयात.
जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे, अगरबत्ती तयार करण्यासाठी पहिल्यांदा मिश्रण तयार करावे लागते. कोळशापुड, जिगट पावडर आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करावी लागते. मग हाताने किंवा मशीनद्वारे मिश्रण बांबूच्या काड्यांवर लावावे. मग तयार अगरबत्त्या सावलीत वाळवाव्यात. वाळल्यानंतर अगरबत्तीची सुगंधी तेलात डीपिंग करावे. शेवटची प्रोसेस म्हणजे तयार झालेल्या अगरबत्ती सुबकपणे पॅक करून विक्रीसाठी पाठवावी.
मशीन आणि गुंतवणूक
अगरबत्ती बनवण्यासाठी मशीनचे तीन प्रकार असतात:
हँड ऑपरेटेड मशीन – ₹10,000 – ₹20,000
सेमी-ऑटोमॅटिक मशीन – ₹50,000 – ₹80,000
फुली ऑटोमॅटिक मशीन – ₹1,00,000 – ₹2,50,000
मशीनचा खर्च पकडून या व्यवसायासाठी ₹50,000 ते ₹5,00,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते. अर्थातच तुम्ही तुमचा व्यवसाय कोणत्या स्टेजने सुरू करणार आहात यावरच या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तुम्हाला अगदीच छोट्या स्तरावर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही 50 हजारातून हा व्यवसाय चालू करू शकता.
किती कमाई होणार ?
जाणकार सांगतात की हा व्यवसाय सुरू केल्यास सरासरी 30% – 50% नफा मिळू शकतो. एक लहान व्यवसाय दररोज 50 किलो अगरबत्ती तयार करून महिन्याला ₹30,000 ते ₹1,00,000 कमवू शकतो.
उत्पादन वाढवून निर्यात व्यवसायात सुद्धा मोठी संधी आहे. म्हणजे अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा काही छोटा व्यवसाय नाही. या व्यवसायातून लखपती नव्हे तर करोडपती सुद्धा होता येऊ शकत. मात्र यासाठी व्यवसायाची ब्रॅण्डिंग, मार्केटिंग अशा सार्या पैलूंवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.