Google Pixel 9 Smartphone Discount Offer : जर तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना गुगल पिक्सल 9 हा नव्याने लॉन्च झालेला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
हा प्रीमियम स्मार्टफोन उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह बाजारात उपलब्ध झाला असून या स्मार्टफोनवर सध्या डिस्काउंट ऑफर सुरू आहे. या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा संगम असून, हा स्मार्टफोन खास फोटोग्राफी आणि परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो.
![Google Pixel 9 Smartphone Discount Offer](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Google-Pixel-9-Smartphone-Discount-Offer.jpeg)
सध्या फ्लिपकार्टवर या फोनवर विशेष सवलत मिळत आहे, ज्यामुळे ग्राहकांना तो स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळते. दरम्यान आज आपण फ्लिपकार्ट वर सुरू असणाऱ्या याच डिस्काउंट ऑफरची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसा आहे स्मार्टफोन?
Pixel 9 मध्ये 6.3-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यामुळे स्क्रीनवर स्क्रोलिंग करताना किंवा गेमिंग अनुभव घेताना अधिक स्मूथ अनुभव मिळतो. या डिस्प्लेमध्ये 1080 x 2424 पिक्सेल रिझोल्यूशन असून, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चा मजबूत संरक्षणात्मक थर दिला आहे, जो स्क्रॅच आणि इतर नुकसानांपासून बचाव करतो.
त्यामुळे हा फोन टिकाऊपणाच्या दृष्टीनेही विश्वासार्ह ठरतो. परफॉर्मन्सच्या बाबतीत, Google Pixel 9 अत्यंत वेगवान आणि कार्यक्षम आहे. यात Google Tensor G4 प्रोसेसर दिला असून, तो मल्टीटास्किंग, गेमिंग आणि एआय-आधारित फीचर्ससाठी विशेषतः डिझाइन केला आहे.
यासोबतच, सुरक्षिततेसाठी टायटन M2 चिप देण्यात आली आहे, जी युझरच्या डेटा आणि पेमेंट सुरक्षेस मदत करते. हा स्मार्टफोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, त्यामुळे गुगलच्या नवीनतम अपडेट्स आणि फीचर्सचा लाभ मिळतो. Google Pixel 9 हा प्रचंड रॅम आणि स्टोरेजबाबतही खास आहे.
यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे, जे मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर करण्यासाठी आणि अनेक अॅप्स सहज चालवण्यासाठी पुरेसे आहे. या फोनची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्याचा कॅमेरा सेटअप. यात ड्युअल रियर कॅमेरा असून, 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 48MP चा सेकंडरी कॅमेरा दिला आहे.
या दोन्ही कॅमेरामध्ये उत्कृष्ट इमेज प्रोसेसिंग टेक्नोलॉजी आहे, जी कमी प्रकाशातही चांगल्या फोटोंसाठी मदत करते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो नैसर्गिक रंग आणि स्पष्टतेसाठी ओळखला जातो.
बॅटरी क्षमतेच्या दृष्टीने, Pixel 9 मध्ये 4700mAh क्षमतेची बॅटरी दिली असून, ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे कमी वेळात फोन चार्ज होतो आणि दीर्घकाळ वापरण्यासाठी पुरेसा बॅकअप मिळतो. तसेच, हा फोन वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करतो, त्यामुळे तो अधिक सोयीस्कर ठरतो.
Google Pixel 9 ची किंमत अन डिस्काउंट ऑफर
Google Pixel 9 ची किंमत पाहता, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 79,999 रुपये आहे. मात्र, सध्या फ्लिपकार्टच्या विशेष सेल दरम्यान हा फोन 74,999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय, एचडीएफसी बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास 4000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते, ज्यामुळे या फोनची किंमत केवळ 70,999 रुपये होते. प्रीमियम स्मार्टफोन शोधत असलेल्या ग्राहकांसाठी Google Pixel 9 हा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो, कारण तो अत्याधुनिक कॅमेरा, दमदार परफॉर्मन्स आणि आकर्षक डिस्प्लेसह येतो.