BYD Electric Car News : तुम्हालाही नव्याने इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. इलेक्ट्रिक कार च्या विक्रीत टाटा कंपनीचा शेअर सर्वात जास्त आहे. टाटाचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ हा फारच मजबूत आहे.
मात्र आता टाटा कंपनीला टक्कर देण्यासाठी इतरही अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत आणि गेल्या काही महिन्यांमध्ये विविध कंपन्यांनी आपले नवनवीन इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात लॉन्च केले आहेत. दरम्यान BYD या कंपनी देखील लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे.
![BYD Electric Car News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/BYD-Electric-Car-News-Update.jpeg)
याचाच परिणाम म्हणून आता भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण होणार आहे. BYD (Build Your Dreams) कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Sealion 7 सादर करून इलेक्ट्रिक वाहन बाजारातील स्पर्धेचा स्तर आणखी वाढवला आहे.
भारतीय बाजारपेठेत या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू शकते, कारण यात जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे, ही गाडी एका चार्ज मध्ये तब्बल 500 किलोमीटर पर्यंतची लॉन्ग रेंज देण्यास सक्षम आहे अन यात काही अत्याधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हेच कारण आहे की ही गाडी ग्राहकांना आवडणार आणि यामुळे या गाडीची लोकप्रियता वाढून इलेक्ट्रिक वाहन बाजारात चांगले टफ कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला दिसणार आहे.
दरम्यान ही कार लाँच होण्याआधीच काही प्रमुख शहरांमध्ये डीलरशिपवर पोहोचली असून ग्राहकांसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या इलेक्ट्रिक SUV चे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत फिचर्स?
BYD Sealion 7 ही दमदार इलेक्ट्रिक SUV 500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. यंदाच्या 2025 भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये ही कार प्रदर्शित करण्यात आली होती आणि आता ती भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक SUV दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सादर केली आहे – RWD (Rear-Wheel Drive) आणि AWD (All-Wheel Drive). RWD व्हेरिएंटमध्ये 82.5 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 308 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क निर्माण करते.
एका चार्जमध्ये हा व्हेरिएंट 482 किमी अंतर पार करू शकतो. दुसरीकडे, AWD व्हेरिएंटमध्ये अधिक पॉवरफुल बॅटरी असून ती 523 bhp पॉवर आणि 690 Nm टॉर्क निर्माण करते. हा प्रकार एका चार्जमध्ये 502 किमी प्रवास करू शकतो. ग्राहकांसाठी ही SUV बुक करणे अगदी सोपे आहे. केवळ 70,000 रुपये टोकन रक्कम भरून ग्राहक ही कार बुक करू शकतात.
विशेष म्हणजे, बुकिंग केल्यानंतर जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही, कारण मार्च 2025 पासून कारची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनी ही SUV प्रीमियम आणि अत्याधुनिक फीचर्ससह बाजारात सादर करत आहे, त्यामुळे ग्राहकांना अनेक नवीन सुविधा मिळतील.
Sealion 7 मध्ये 5.6-इंच रोटेटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, स्पोर्टी फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 11 एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच, कंपनीने याला ऑल-एलईडी लाइटिंग आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देखील दिली आहेत, जी कारचा लूक अधिक आकर्षक बनवतात.
किंमत किती राहणार?
किमती बाबत बोलायचं झालं तर BYD ने अद्याप Sealion 7 ची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही, मात्र ती MG ZS EV, Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 यांसारख्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक SUV सोबत जबरदस्त स्पर्धा करणार आहे. यात दमदार बॅटरी, उत्कृष्ट रेंज आणि आधुनिक तंत्रज्ञान असेल अन म्हणून ही कार भारतीय ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.