शास्त्रज्ञांची धक्कादायक भविष्यवाणी ! पृथ्वीचा नकाशा बदलणार, ‘हा’ मोठा खंड दोन भागात विभागणार, एक नवीन महासागर तयार होणार

सध्या शास्त्रज्ञांच्या या ताज्या संशोधनाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. आफ्रिका खंड दोन भागात जर विभागला गेला तर त्याचा नेमका काय परिणाम होणार याबाबत आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Tejas B Shelar
Published:

Viral News : जगावर चार वर्षांपूर्वी एक मोठं संकट आलं होतं ते संकट होत कोरोना नावाच्या महामारीच. दरम्यान आता जगावर पुढील काही वर्षांनी एक अतिशय मोठं संकट येणार आहे. या संकटामुळे मानवाचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. शास्त्रज्ञांनी नुकतेच एक संशोधन केले आहे आणि या संशोधनात आफ्रिका खंड दोन भागात विभागला जाणार आणि याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर एक नवीन महासागर तयार होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

यामुळे सध्या शास्त्रज्ञांच्या या ताज्या संशोधनाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. आफ्रिका खंड दोन भागात जर विभागला गेला तर त्याचा नेमका काय परिणाम होणार याबाबत आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मंडळी, पृथ्वीच्या आत सतत काही ना काही भौगोलिक हालचाली घडत असतात, ज्या मानवांसाठी अत्यंत संथ वाटू शकतात, पण खऱ्या अर्थाने या हालचाली वेगाने घडत असतात.

दरम्यान अशीच एक भौगोलिक घटना आफ्रिका खंडात घडताना दिसत आहे. शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिकेतील पूर्व भागात एक मोठी दरी तयार झाली आहे अन ही दरी हळूहळू विस्तारत आहे. याचा परिणाम म्हणून भविष्यात आफ्रिका खंड दोन भागात विभागला जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे फक्त आफ्रिका खंड दोन भागात विभागला जाणार नाही तर एका नव्या महासागराची सुद्धा निर्मिती होणार आहे आणि यामुळे पृथ्वीचा बहुतांशी भाग पाण्याखाली जाण्याची सुद्धा शक्यता आहे. दरम्यान आता आपण आफ्रिका खंड दोन भागात विभागण्याचे नेमके कारण काय? शास्त्रज्ञांना नव्या संशोधनात नेमके काय आढळले आहे? याच मुद्द्यांची तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.

आफ्रिका खंड दोन भागात विभागण्याचे कारण

आफ्रिका खंड दोन भागात विभागला जाईल असा दावा शास्त्रज्ञांकडून केला जात असून यासाठी टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचाली कारणीभूत आहेत, असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. वैज्ञानिकांना असे आढळले आहे की, जमिनीखालील बदल अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने होत आहेत, आणि त्यामुळे पृथ्वीच्या नकाशामध्ये मोठा बदल घडू शकतो.

शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार, आफ्रिकन आणि सोमाली टेक्टोनिक प्लेट्स दरवर्षी जवळपास 0.8 सेंटीमीटरच्या वेगाने एकमेकांपासून दूर जात आहेत. या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणावर भेगा पडत आहेत, ज्यामुळे भूभाग कमकुवत होत आहे. विशेषतः इथिओपियामधील अफार प्रदेशात सुमारे 60 किलोमीटर लांबीची आणि 10 मीटर खोलीपर्यंत पोहोचणारी मोठी भेग आढळून आली आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की ही प्रक्रिया पूर्वी लाखो वर्षे चालेल असा अंदाज होता, पण आता ती केवळ 10 लाख वर्षे किंवा त्याहून कमी कालावधीत पूर्ण होऊ शकते. पूर्व आफ्रिकन रिफ्ट सिस्टीम ही मोझांबिकपासून तांबड्या समुद्रापर्यंत पसरलेली असून, ती पृथ्वीच्या भूगर्भीय रचनेत मोठा बदल घडवून आणत आहे.

जेव्हा आफ्रिका खंड पूर्णपणे तुटेल, तेव्हा त्या प्रदेशात नवीन महासागर निर्माण होईल. यामुळे आफ्रिकेचा नकाशा कायमचा बदलेल आणि अनेक देशांचे भौगोलिक स्थानही वेगळे होईल. याच प्रकारची प्रक्रिया लाखो वर्षांपूर्वी अटलांटिक महासागराच्या निर्मितीसाठी जबाबदार होती. २००५ मध्ये इथिओपियामध्ये झालेल्या एका मोठ्या भूगर्भीय घटनेने संशोधकांना या प्रक्रियेबाबत अधिक ठोस पुरावे मिळवून दिले.

काही आठवड्यांतच 420 हून अधिक भूकंप झाले, ज्यामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आणि भूभाग विभागला गेला. शास्त्रज्ञांच्या मते, टेक्टोनिक प्लेट्सचे विभाजन आणि हालचाली नेहमीच संथ नसतात. काहीवेळा या हालचाली अचानक वेगाने होऊ शकतात, आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

आफ्रिका खंडाचे दोन भाग झाल्यास काय होणार

आफ्रिका खंड तुटल्यास, त्याचे दोन भाग झाल्यास एक नवीन महासागर सुद्धा तयार होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याचे दूरगामी परिणाम होतील. नवीन महासागर तयार झाल्याने झांबिया आणि युगांडासारख्या भूपरिवेष्ठित देशांना थेट समुद्रमार्ग उपलब्ध होईल. मात्र, काही भूभाग समुद्राच्या पातळीखाली जाऊ शकतात, ज्यामुळे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.

नवीन महासागरामुळे व्यापार मार्ग बदलतील, आणि नवीन बंदरांची उभारणी होईल, ज्यामुळे त्या भागातील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये मोठा बदल घडेल. याशिवाय, सागरी पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शास्त्रज्ञ या प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि भविष्यात होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करत आहेत. आफ्रिका खंडाच्या विभाजनामुळे पृथ्वीचा नकाशा कायमस्वरूपी बदलेल, आणि मानवी समाजाला या भौगोलिक बदलांशी जुळवून घ्यावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe