१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : गेल्या विस ते पंचवीस वर्षातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीची अत्यंत फेमस झालेली कॉपीची परंपरा यंदा खंडित करण्यात जिल्हा परीषद ,महसुल, शिक्षण , पोलिस सर्वंच विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना यश आले आहे.मात्र दुसरीकडे या परीक्षेत कॉपी करु दिली नाही म्हणुन मनात राग धरुन पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या केंद्रावरील एका शिक्षकास शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यात बारावीच्या परीक्षेसाठी बारा परीक्षा केंद्र आहेत. ५७०४ विद्यार्थ्य़ी परीक्षा देत आहेत.मंगळवारी बारावीचा पहीलाच पेपर होता.तालुक्यातील तिसगाव येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापुर्वी एका जणाने
खिडकीची जाळी तोडली.त्यावेळी एका शिक्षकाला बाहेरुन चाकु देखील दाखवला गेला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-91.jpg)
त्यांनतर काँपी करुन दिली नाही,याचा राग धरुन शिक्षक सुनिल दिंगबर शेटे यांना एका अनोळखी व्य़क्तीने बारावीचे पेपर घेवुन जाणारी गाडी अडवुन शेटे यांना तु माझ्या बहीनीला कॉपी करुन दिली नाही म्हणुन तुला पाथर्डीत येवुन जिवे मारुन टाकील अशी धमकी दिली. याबाबत केंद्र संचालक हेमंत नागरे यांनी पाथर्डी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरु्दध गुन्हा दाखल केला आहे.
यामुळे अतिशय कडक नियोजन करुनही परीक्षेला गालबोट लागले आहे.आजवर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका कॉपीसाठी प्रसिद्ध झाला होता.त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरील विद्यार्थी प्रवेश घेत असत मात्र यंदा तालुक्यात कॉपीवर आळा घालण्यात संघटीत प्रयत्नाला यश आले आहे. सीसीटीव्ही कँमेरे, व्हीडीओ शुटींग व गुगल मिटच्या माध्यामातुन थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी प्रत्येक परीक्षाकेंद्र जोड़ले गेलेले आहे.तरी देखील एका केंद्रावर काही शिक्षकांनी मोबाईलची बँटरी संपली असा बनाव करुन काँपी करण्यासाठी काहीवेळ गुगल मिट बंद केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे त्या शिक्षकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.