१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : अहिल्यानगर येथून शोरूम मधून नवीन दुचाकी घेऊन ती घरी नेत असतानाच दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे.यात घरी जाण्यासाठी निघालेले तरुण घरापर्यंत पोहचलेच नाहीत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील आदित्य संदीप नलगे आणि किरण मोहन लगड हे दोन तरुण मित्रांसह अहिल्यानगर येथे नवीन दुचाकी आणण्यासाठी गेले होते.रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नगर दौंड महामार्गावरील कोळगाव फाटा परिसरात नगर कडून परतत असताना दौंड कडून नगरकडे भरधाव वेगाने द्राक्ष घेऊन चाललेल्या (एम.एच. १८ बी.जी २९९५) या पीकअपने जोराची भीषण धडक दिली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-92.jpg)
या धडकेत आदित्य संदीप नलगे याच्या पोटावरून चारचाकी गाडीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या किरण लगड याला परिसरातील तरूणानी उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारा दरम्यान किरण याचा देखील मृत्यू झाला.हे दोघेही कोळगाव येथील रहिवासी आहेत.अपघातात दुचाकीचे ही नुकसान झाले आहे.