Mutual Fund Scheme : जर तुम्हाला शेअर्समध्ये थेट गुंतवणूक न करता दीर्घकालीन संपत्ती तयार करायची असेल, तर तुमच्यासाठी Mutual Fund चा पर्याय तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. म्युच्युअल फंड हा गुंतवणूकीचा चांगला ऑप्शन आहे. यात गुंतवणूकदारांना सरासरी 12% दराने परतावा मिळतोय.
दरम्यान जर तुम्हाला यात गुंतवणूक करायची असेल तर फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंड तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 1 डिसेंबर 1993 रोजी लॉन्च झालेल्या या लार्ज कॅप इक्विटी फंडाने गेल्या 31 वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. आता आपण या फंडाची माहिती जाणून घेणार आहोत.
![Mutual Fund Scheme](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Mutual-Fund-Scheme-2.jpeg)
एकरकमी गुंतवणुकीवर 75 पट परतावा मिळाला
फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 18.04% वार्षिक सरासरी परतावा मिळवून दिला आहे. जर कोणी 1993 मध्ये या फंडात फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याची रक्कम आजच्या घडीला 75.23 कोटी रुपये झाली असती.
याचप्रमाणे, वेगवेगळ्या कालावधीत या फंडाने दिलेले परतावे पुढीलप्रमाणे आहेत:
1 वर्षात परतावा: 8.63%
3 वर्षांत परतावा: 16.69%
5 वर्षांत परतावा: 17.42%
10 वर्षांत परतावा: 13.18%
15 वर्षांत परतावा: 12.62%
SIP गुंतवणुकीतून 2.47 कोटींची संपत्ती
जर तुम्ही या फंडात मासिक 2,000 रुपयांची एसआयपी (SIP) गुंतवणूक केली असती, तर गेल्या 31 वर्षांत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.44 लाख रुपये राहील असतं. मात्र, फंडाच्या 18.02% सरासरी वार्षिक परताव्यामुळे ही रक्कम तब्बल 2.47 कोटी रुपये झाली असती.
फंडाचा पोर्टफोलिओ आणि वैशिष्ट्ये
फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंड हा लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे. म्हणजेच, तो मार्केट कॅपिटलायझेशनच्या टॉप 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
एकूण AUM (Asset Under Management): 7,682.65 कोटी रुपये
एक्स्पेन्स रेश्यो: 1.86%
सेक्टर वाइज गुंतवणूक: बँकिंग, IT, ऑटोमोबाईल, हेल्थकेअर आणि इतर महत्त्वाच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक
गुंतवणूक करावी का?
जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल आणि शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करू इच्छित असाल, तर फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंड एक उत्तम पर्याय आहे. तथापि, गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.