Numerology:-तुमच्या मुलांकावर अवलंबून आहे तुमचं भविष्यातील करिअर.. जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात तुम्ही बनू शकतात सुपरस्टार

नेक लोकांना त्यांच्या भविष्यातील करिअरविषयी उत्सुकता असते. योग्य क्षेत्र निवडल्यास माणूस मोठे यश मिळवू शकतो आणि आयुष्य आनंदी व ऐश्वर्यसंपन्न होऊ शकतं. अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा विशिष्ट मूलांक असतो. जो त्याच्या स्वभाव, क्षमता आणि योग्य करिअर निवडण्यास मदत करतो

Ratnakar Ashok Patil
Published:

Numerology Science :- अनेक लोकांना त्यांच्या भविष्यातील करिअरविषयी उत्सुकता असते. योग्य क्षेत्र निवडल्यास माणूस मोठे यश मिळवू शकतो आणि आयुष्य आनंदी व ऐश्वर्यसंपन्न होऊ शकतं. अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा विशिष्ट मूलांक असतो. जो त्याच्या स्वभाव, क्षमता आणि योग्य करिअर निवडण्यास मदत करतो.

मूलांक कसा ठरवायचा?

जर तुमचा जन्म एक आकडी तारखेला (1 ते 9) झाला असेल तर तोच तुमचा मूलांक राहतो. मात्र, जर तुमचा जन्म दोन आकडी तारखेला (10 ते 31) झाला असेल तर त्या दोन संख्यांची बेरीज केली जाते आणि त्यातून मिळणारा एक आकडी संख्याच तुमचा मूलांक असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 29 तारखेला झाला असेल तर 2+9 = 11 आणि 1+1 = 2. अशा प्रकारे त्या व्यक्तीचा मूलांक 2 असेल.

मूलांकानुसार सर्वोत्तम करिअर पर्याय

मूलांक 1, 3 आणि 5 असलेल्या व्यक्तीं

यांच्यामध्ये नैसर्गिक नेतृत्वगुण असतात. या व्यक्ती स्वभावाने आत्मविश्वासू, महत्त्वाकांक्षी आणि स्वतंत्र विचारसरणीच्या असतात. त्यांच्याकडे इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असते. त्यामुळे त्या उत्तम नेता बनू शकतात.

या लोकांनी राजकीय क्षेत्र, कला आणि मनोरंजन, तसेच उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांत करिअर केल्यास मोठे यश मिळू शकते. अशा व्यक्ती मोठे नेते, अभिनेते, गायक, चित्रकार किंवा यशस्वी व्यावसायिक बनण्याची क्षमता ठेवतात. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर त्यात यश मिळण्याची शक्यता खूप जास्त असते.

मूलांक 2, 4 आणि 6 असलेल्या व्यक्ती

या मुलांकाचे व्यक्ती स्वभावाने जबाबदारी स्वीकारणाऱ्या, भावनिक आणि मदतीला तत्पर असतात. त्यांना समाजसेवा करण्याची आवड असते. त्यामुळे त्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठं यश मिळवू शकतात. अशा लोकांनी शिक्षक, प्राध्यापक, मार्गदर्शक किंवा समाजसेवक होण्याचा विचार करावा.

तसेच त्यांच्यात निस्वार्थ भाव असतो आणि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला तर ते उत्तम डॉक्टर, परिचारिका किंवा मानसोपचारतज्ज्ञ होऊ शकतात. अशा व्यक्तींमध्ये सहकार्य करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे त्या प्रशासन आणि समाजसेवा क्षेत्रातही चांगली कारकीर्द घडवू शकतात.

मूलांक 7, 8 आणि 9

हा मुलांक असलेल्या व्यक्ती मेहनती, जिज्ञासू आणि तांत्रिक क्षेत्रात प्रचंड आवड असलेल्या असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते आणि त्या सखोल विचार करणाऱ्या असतात. त्यामुळे अशा लोकांनी संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांत आपले करिअर करावे.

हे लोक मोठे शास्त्रज्ञ, संशोधक, अभियंते किंवा डेटा सायंटिस्ट बनू शकतात. याशिवाय त्यांच्यात वित्तीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य असते. त्यामुळे ते बँकिंग, आर्थिक सल्लागार किंवा व्यवस्थापक यांसारख्या क्षेत्रांतही उत्तम करिअर करू शकतात.

अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांक असलेल्या व्यक्तींच्या ठराविक गुणांवरून त्यांच्यासाठी योग्य करिअर निवडणे सोपे होते. ज्योतिषी अखिलेश यांच्या मते जर व्यक्तीने आपल्या मूलांकानुसार योग्य क्षेत्र निवडले आणि त्यात सातत्याने मेहनत घेतली तर त्या व्यक्तीला निश्चितच मोठे यश मिळू शकते. योग्य निर्णय घेतल्यास आणि आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर केल्यास तुम्ही तुमचे आयुष्य ऐश्वर्यात घालवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe