Success Story: 15 वर्षी शिक्षण सोडलं,मुंबईत संघर्ष केला आणि आज आहे अब्जाधीश…एका दिवसाची कमाई वाचून डोळे होतील पांढरे

गौतम अदानी हे नाव आज जगभरात ओळखलं जातं. भारतीय उद्योगविश्वात त्यांचा प्रभाव प्रचंड असून त्यांचे विविध व्यवसाय ऊर्जा, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, विमानतळ, बंदरे आणि डेटा सेंटर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत. त्यांची संपत्ती झपाट्याने वाढत असून, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, ते जगातील 15 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:

Gautam Adani Success Story:- गौतम अदानी हे नाव आज जगभरात ओळखलं जातं. भारतीय उद्योगविश्वात त्यांचा प्रभाव प्रचंड असून त्यांचे विविध व्यवसाय ऊर्जा, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, विमानतळ, बंदरे आणि डेटा सेंटर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत. त्यांची संपत्ती झपाट्याने वाढत असून

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, ते जगातील 15 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. सध्या त्यांची संपत्ती 69.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे, त्यामुळे ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले आहेत. मात्र सर्वसामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचं सत्य म्हणजे त्यांची दिवसाची कमाई तब्बल 1600 कोटी रुपये आहे.

गौतम अदानींचे यशाचे रहस्य

ही प्रचंड संपत्ती कशी मिळवली याबद्दल बोलताना एका मुलाखतीत गौतम अदानी यांनी त्यांच्या यशाचं रहस्य सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की, ते कधीही नफ्याच्या आकड्यांमागे धावत नाहीत.परंतु योग्य धोरण, मेहनत आणि स्मार्ट गुंतवणुकीच्या जोरावर त्यांनी हे मोठं उद्योगसाम्राज्य उभं केलं आहे. त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.

फक्त १५ व्या वर्षी त्यांना काही कारणाने शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या करिअरच्या शोधात मुंबई गाठली. चार वर्षे त्यांनी मुंबईत राहून व्यवसायाच्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला आणि मग अहमदाबादला परतले. मुंबईने त्यांना मेहनतीचं महत्त्व शिकवलं आणि तिथे मिळालेल्या शिकवणींवर त्यांनी संपूर्ण आयुष्य उभारलं.

अदानी समूहाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील महत्वाच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि विमानतळ व्यवस्थापन क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या कंपन्या भारताच्या आर्थिक वाढीला चालना देणाऱ्या आहेत.त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या व्यवसायधोरणांमुळे देशातील लाखो लोकांना रोजगार मिळत आहे आणि संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० फेब्रुवारी रोजी “फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट १९७७” वर बंदी घातली, त्यामुळे अदानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कायद्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई होण्याची शक्यता होती. परंतु या निर्णयानंतर त्यांची चिंता दूर झाली आहे.

गौतम अदानी यांचा हा प्रवास प्रत्येक उद्योजकासाठी आणि नवोदित व्यावसायिकांसाठी एक प्रेरणा आहे. शिक्षण अपूर्ण राहूनही त्यांनी मेहनतीच्या जोरावर आपलं भाग्य घडवलं. योग्य धोरणं आणि संधी ओळखण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे ते आज भारतातील आघाडीचे उद्योगपती बनले आहेत. त्यांच्या यशाचा आलेख पाहता भविष्यात त्यांची संपत्ती आणि व्यवसाय आणखी मोठ्या उंचीवर पोहोचतील, यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe