iQOO Neo 10R ग्राहकांना लावणार वेड.. मिळणार 6400mAh बॅटरी आणि गेमिंग प्रोसेसर.. तेही भन्नाट किमतीत

iQOO भारतात त्यांचा नवीनतम स्मार्टफोन iQOO Neo 10R लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या मते हा स्मार्टफोन आपल्या किंमत श्रेणीतील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली फोन असेल. उत्कृष्ट प्रोसेसर, प्रीमियम डिझाइन, दमदार बॅटरी आणि उच्च-गुणवत्तेचा कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये यामध्ये पाहायला मिळतील.

Ratnakar Ashok Patil
Published:

iOOO Neo 10R:- iQOO भारतात त्यांचा नवीनतम स्मार्टफोन iQOO Neo 10R लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या मते हा स्मार्टफोन आपल्या किंमत श्रेणीतील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली फोन असेल. उत्कृष्ट प्रोसेसर, प्रीमियम डिझाइन, दमदार बॅटरी आणि उच्च-गुणवत्तेचा कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये यामध्ये पाहायला मिळतील. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन परिपूर्ण असेल. कंपनी ग्राहकांना प्रीमियम वैशिष्ट्ये अधिक परवडणाऱ्या दरात देण्याचा प्रयत्न करत आहे.ज्यामुळे हा फोन बाजारातील एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

iQOO Neo 10R स्मार्टफोनची अपेक्षित किंमत

भारतात हा फोन 30,000 च्या आसपास लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या किंमतीत सहसा महागड्या फोनमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये दिली जातील. iQOO ची ओळख नेहमीच “हाय-परफॉर्मन्स स्मार्टफोन” या श्रेणीत राहिली आहे आणि हा फोन देखील त्याच पद्धतीने तयार केला आहे. लाँचनंतर तो ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होईल.

iQOO Neo 10R मधील प्रोसेसर

परफॉर्मन्सच्या दृष्टीने iQOO Neo 10R मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक अत्यंत वेगवान चिपसेट असून तो फोनला सुपर स्मूथ परफॉर्मन्स देतो.गेमिंग, मोठ्या अॅप्सचा वापर किंवा मल्टीटास्किंग करताना कोणतीही अडचण जाणवणार नाही. विशेषतः हाय-एंड गेमिंगसाठी हा प्रोसेसर उपयुक्त आहे. कारण तो उत्कृष्ट ग्राफिक्स आणि वेगवान प्रोसेसिंगसह फोनला अधिक प्रभावी बनवतो.

iQOO Neo 10R चा डिस्प्ले

डिस्प्लेच्या बाबतीत, iQOO Neo 10R मध्ये 6.78-इंच AMOLED स्क्रीन दिली आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR सपोर्ट असेल. ज्यामुळे स्क्रीनवरील रंग अधिक चमकदार दिसतील आणि डार्क मोड अधिक गडद व आकर्षक वाटेल. हा मोठा आणि उत्तम ब्राईटनेस असलेला डिस्प्ले व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे आणि सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यासाठी उत्कृष्ट ठरेल.

या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 6,400mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी दिवसभर टिकेल. जर तुम्ही सतत फोन वापरत असाल तरीही तुम्हाला वारंवार चार्जिंग करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्यामुळे फोन काही मिनिटांतच पूर्ण चार्ज होऊ शकतो. हे वैशिष्ट्य प्रवास करणाऱ्या किंवा व्यस्त वेळापत्रक असणाऱ्या युजर्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

iQOO Neo 10R मधील कॅमेरा

फोटोग्राफीच्या प्रेमींसाठी iQOO Neo 10R मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.जो स्पष्ट आणि उच्च-गुणवत्तेचे फोटो काढण्यास सक्षम आहे. याशिवाय 8MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स दिला आहे, जो मोठ्या फ्रेममधील फोटो कॅप्चर करण्यास मदत करतो. सेल्फीप्रेमींसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी एकदम परफेक्ट ठरेल.

iQOO Neo 10R स्मार्टफोनमधील स्टोरेज

स्टोरेज आणि मेमरीच्या दृष्टीने, iQOO Neo 10R मध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज दिले आहे. अधिक RAM मुळे फोन मल्टीटास्किंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल.तर 256GB च्या स्टोरेजमुळे वापरकर्त्यांना जागा कमी पडण्याची चिंता भासणार नाही. मोठ्या फाइल्स, व्हिडिओ, अॅप्स आणि गेम्स सहज साठवता येतील.

या फोनचे डिझाइन

स्टायलिश आणि आधुनिक ठेवण्यात आला आहे. जो विविध रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.3 आणि NFC यांसारख्या आधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन भविष्यातील नेटवर्कसाठी पूर्णपणे तयार आहे.

एकूणच पाहता iQOO Neo 10R हा 30,000 च्या श्रेणीतील सर्वात वेगवान आणि पॉवरफुल स्मार्टफोन ठरू शकतो. उत्कृष्ट हार्डवेअर, आकर्षक डिझाइन, उच्च-गुणवत्तेचा कॅमेरा आणि दमदार बॅटरी यामुळे हा फोन कोणत्याही प्रकारच्या युझर्ससाठी योग्य पर्याय असेल. जर तुम्ही एक शक्तिशाली, वेगवान आणि दीर्घकाळ टिकणारा स्मार्टफोन शोधत असाल तर iQOO Neo 10R तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe