Saturn Transit 2025: ‘या’ तीन राशींना होणार जबरदस्त धनलाभ, बँक बॅलन्स वाढण्याची आहे संधी! यात आहे का तुमची राशी?

शनि ग्रहाला न्याय आणि कर्माचा देवता मानले जाते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार २ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:

Horoscope March 2025:- शनि ग्रहाला न्याय आणि कर्माचा देवता मानले जाते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत.

हे संक्रमण 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजेपर्यंत राहील. या बदलाचा संपूर्ण बारा राशींवर परिणाम होणार असला तरी काही विशिष्ट राशींना प्रचंड लाभ मिळेल. विशेषतः, मेष, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अत्यंत शुभ ठरणार आहे.

पूर्वाभाद्रपद नक्षत्राचे महत्त्व

पूर्वाभाद्रपद नक्षत्र हे एक शुभ नक्षत्र मानला जातो. ज्याचा स्वामी गुरू ग्रह आहे. या नक्षत्रात जन्मलेले लोक धाडसी आणि कर्तृत्ववान असतात. हे नक्षत्र चार चरणांत विभागले गेले असून प्रत्येकाचा वेगळा प्रभाव असतो. शनि या नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे ज्या राशींवर त्याचा चांगला प्रभाव पडतो त्यांना जीवनात यश, संपत्ती आणि वैभव प्राप्त होऊ शकते.

या राशींना होणार मोठा लाभ

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी मार्च महिना अत्यंत शुभ ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच पगारवाढीचेही संकेत आहेत. व्यापाऱ्यांसाठी हा काळ नफ्याचा ठरणार आहे.त्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.

गृहस्थ जीवनात आनंददायक घटना घडतील आणि कुटुंबात नवीन पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी हा काळ आरोग्यदृष्ट्या चांगला असेल व त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तूळ राशी

तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी राहील. अभ्यासात उत्कृष्टता मिळवण्यासाठी शनि त्यांना आत्मविश्वास आणि धैर्य देईल. व्यापाऱ्यांना नवीन मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे व त्यामुळे नफा वाढेल.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा महिना शुभ मानला जात आहे. युवा वर्गासाठी वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरू शकते. ज्यामुळे त्यांच्या करिअरला नवीन दिशा मिळेल. तसेच मोठ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी करण्याचा उत्तम काळ आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक लाभांचा असणार आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो व त्यामुळे व्यापाऱ्यांनी योग्य संधी शोधाव्यात. कुटुंबात शांती राहील आणि घरात शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. तसेच काही जण नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकतात.

शनिच्या गोचर काळातील संधी

या संक्रमणाचा म्हणजेच गोचराचा प्रभाव मार्च महिन्यात जास्त जाणवेल. मेष, तूळ आणि वृश्चिक राशींनी या काळात योग्य निर्णय घेतल्यास त्यांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होऊ शकतात.

नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी आणि शनि कृपेशी सुसंगत राहण्यासाठी मेहनत, संयम आणि सातत्य आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्माचे फळ देणारा ग्रह अर्थात देवता असल्याने चांगले कर्म केल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe