वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत ‘या’ 5 सवयी लावून घ्या ! तुम्हाला कधीच आर्थिक तंगी भासणार नाही, Cibil Score पण चांगला राहिल

अनेक जण आपल्या चुकीच्या सवयींमुळे अगदी तरुण वयातच कर्जबाजारी होतात. कर्जबाजारीपणामुळे काही तरुणांनी अक्षरशा आत्महत्या सुद्धा केलेली आहे. यामुळे पैसे कमावणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच त्याचे व्यवस्थापन करणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

Tejas B Shelar
Published:

Cibil Score : आपण सर्वजण अहोरात्र काबाडकष्ट करतो आणि पैशांचा संचय करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक नवयुवक तरुण भरपूर पैसे कमावतात मात्र पैशांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहतच नाहीत. महत्त्वाचे म्हणजे अनेक जण आपल्या चुकीच्या सवयींमुळे अगदी तरुण वयातच कर्जबाजारी होतात.

कर्जबाजारीपणामुळे काही तरुणांनी अक्षरशा आत्महत्या सुद्धा केलेली आहे. यामुळे पैसे कमावणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच त्याचे व्यवस्थापन करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. ऐन तरुणवयात मुलं कर्जबाजारी होतात, परिणामी त्यांचा सिबिल स्कोर खराब होतो यामुळे त्यांना कोणत्याच बँकाकडून भविष्यात कर्ज मिळू शकत नाही.

मात्र जर तरुणांनी काही चांगल्या सवयी लावून घेतल्यात तर ते कधीच कर्जबाजारी होणार नाहीत आणि त्यांचा सिव्हिल स्कोर देखील कधीच खराब होणार नाही. दरम्यान आज आपण तरुणांना अशा पाच टिप्स देणार आहोत ज्यामुळे त्यांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होणार आहे.

पैशांची आठवण असावी : आपले पैसे कुठे आहेत आणि किती आहेत याची आपल्याला आठवण असणे आवश्यक आहे. आपण कोणाला उसनवारीने पैसे दिले आहेत का किंवा आपण कुणाकडून पैसे घेतले आहेत का याची सुद्धा आपल्याला आठवण असणे आवश्यक आहे.

यासाठी, आपण नेहमीच आपले बँक खाते शिल्लक तपासले पाहिजे, क्रेडिट कार्ड बिल ट्रॅक करायला हवे. त्याच वेळी, आपण आपल्या बजेटच्या बाहेर जात नाही असा आपला दैनंदिन खर्च मागोवा ठेवला पाहिजे. म्हणजेच जुने लोक सांगतात तसे जेवढे अंथरून तेवढेच पाय पसरावेत. या सर्व सवयी भविष्यात आपल्याला फायदेशीर ठरतात.

दीर्घकालीन गुंतवणूक करा : नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, भविष्यात आपल्याला किती आणि कोणत्या गोष्टींसाठी पैशांची आवश्यकता पडणार आहे याच मूल्यमापन करा आणि त्यानुसार गुंतवणुकीचा निर्णय घ्या. जसे की मुलांचे शिक्षण, विवाह, वैद्यकीय खर्च, घरे खरेदी, कार खरेदी इ. गोष्टींसाठी आपल्याला पैशांची गरज भासणार असते आणि अशा गोष्टींसाठी कधीही दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते.

जर आपण या आवश्यक गोष्टींसाठी नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच गुंतवणुकीला सुरुवात केली तर तुम्ही नियोजित वेळेत त्या गोष्टींसाठी आवश्यक पैसा उभा करू शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी कमी गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा फंड मिळू शकतो.

इमर्जन्सी फंड तयार करा : बहुतेक लोक अशी चूक करतात की ते आपत्कालीन निधी ठेवत ​​नाहीत. कधी इमर्जन्सी पैशांची गरज भासली तर आपल्याकडे एक इमर्जन्सी फंड असायला हवा ज्या मधून आपण आपली गरज पूर्ण करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने इमर्जन्सी फंड तयार करायला हवा.

Cibil Score चांगला असायला हवा : आपला क्रेडिट इतिहास कसा आहे हे Cibil स्कोअर दर्शविते. म्हणून जर आपण आपले सर्व कर्ज ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड बिले वेळेत भरलीत तर तुमचा सिबिल स्कोर चांगला राहणार आहे. जर आपण काही कर्ज डीफॉल्ट केले असेल तर सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. सिबिल स्कोअर 300 ते 900 पर्यंत असतो. सिबिल स्कोर हा 700 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे यामुळे ग्राहकांना सहज कर्ज मंजूर होते.

प्रत्येक गोष्टीचं बजेट तयार करा : जर आपल्याला आपला खर्च व्यवस्थापित करायचा असेल तर यासाठी बजेट बनविणे फार महत्वाचे आहे, अन्यथा आपल्या आयुष्यात समस्या उद्भवू शकतात. जर आपण बजेट तयार केले नाही तर आपण अधिक पैसे खर्च कराल. यामुळे तुमचे पैसे कधीच सेव होणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe