लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी देवगड येथे भरली खंडोबाची तळी

Ahmednagarlive24
Published:

Sangmaner News : संगमनेर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवगडच्या यात्रेनिमित्त तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी पर्यटन विकास अंतर्गत नागरिकांसाठी चांगली सुविधा करण्यात आली असून येथे दिवसेंदिवस वाढणारी उपस्थिती ही वैशिष्ट्य असून देवगड हे तालुक्यातील सर्व भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून त्यांनी खंडोबारायाची महाआरती करून पारंपारिक पद्धतीने तळी भरली हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थानच्या वतीने श्री खंडोबारायाची तळी भरण्यात आली.

यावेळी मा. मंत्री बाळासाहेब थोरात ,मा आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, सरपंच सुभाष गडाख, डॉ प्रमोद पावसे ,संदीप पावसे यांच्यासह देवस्थानचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवगड येथे संगमनेर तालुक्यातील भाविकांची पौर्णिमा यात्रेनिमित्त मोठी गर्दी असते. पारंपारिक पद्धतीने परिसरातील व तालुक्यातील नागरीक या ठिकाणी येत असून खंडोबा रायाची तळी भरण्यात येते .याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजने होत असते. खाऊ चे, दुकाने मोठ्या संख्येने या ठिकाणी थाटलेली असतात. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, खंडोबा देवस्थानला यात्रेनिमित्त दरवर्षी आम्ही लहानपणापासून बैलगाडीतून येत असत.

आता काळ बदलला असून मोठ्या संख्येने वाहनांच्या माध्यमातून नागरिक येथे येतात. राजहंस दूध संघाने या परिसरामध्ये वृक्षारोपण व संवर्धन केले असून त्यामुळे देवगडचा डोंगर हिरवा झाला आहे. अगदी लगत निळवंडे उजवा कालवा जात असल्याने या परिसरात आता समृद्धी आली आहे. याचबरोबर पर्यटन विभागाच्या माध्यमातून या देवस्थानच्या विकासाकरता आपण सातत्याने निधी दिला असून त्यामुळे हा परिसर विकसित झाला आहे.

अजूनही या परिसराच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळून भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येतील. देवगडचे अश्व प्रदर्शन हेही राज्यात लोकप्रिय झाले आहे.खंडोबाचा मल्हारी मार्तंड हे सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असून प्रति जेजुरी म्हणून आपण देवगडचा उल्लेख करतो आणि म्हणून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक वर्षभर येत असतात असे ते म्हणाले

यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले की, दरवर्षी आपण अश्व प्रदर्शनाचे मोठे आयोजन करतो. यावर्षी लहान स्वरूपात असून पुढील वर्षी पुन्हा मोठ्या स्वरूपात प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार डॉ तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत लोकनेते बाळासाहेब थोरात व इतर मान्यवरांनी खंडोबारायाची तळी भरली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe