Hyundai Creta Hybrid Car:- भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांची मर्यादा यामुळे ग्राहक हायब्रिड कारकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत Hyundai इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही क्रेटाला हायब्रिड इंजिनसह लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन तंत्रज्ञानासह ही गाडी जास्त मायलेज, कमी उत्सर्जन आणि उत्तम परफॉर्मन्स सह बाजारात येणार आहे. क्रेटाचा हा हायब्रिड व्हेरिएंट ग्राहकांसाठी इंधन बचत आणि उत्तम सुरक्षिततेचा पर्याय ठरणार आहे.
Hyundai Creta Hybrid मधील इंजिन
क्रेटा हायब्रिडमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर आणि मजबूत हायब्रिड सिस्टम देण्यात येईल. या तंत्रज्ञानामुळे गाडीचे इंधन कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल. सध्या बाजारात असलेली क्रेटा 21.8 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते.
परंतु हायब्रिड तंत्रज्ञानामुळे हे प्रमाण 26 ते 28 किमी प्रति लिटर इतके जाऊ शकते. याचा अर्थ असा की, ही एसयूव्ही पेट्रोलवर चालणाऱ्या मॉडेलपेक्षा अधिक मायलेज आणि कमी प्रदूषण करेल.
Hyundai Creta Hybrid कारचे डिझाईन
डिझाइनच्या बाबतीत क्रेटा हायब्रिडमध्ये काही सुधारणा केल्या जाऊ शकतात. सध्याच्या मॉडेलमध्ये असलेली प्रीमियम फीचर्स यामध्येही समाविष्ट असतील. यात 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन एसी, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखी फीचर्स दिली जातील.
याशिवाय, 8-स्पीकर साउंड सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि ADAS (Advanced Driver Assistance System) सेफ्टी टेक्नॉलॉजी यासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात येतील.
भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटा नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. पहिल्यांदा 2015 मध्ये लाँच झालेली ही कार 2018 मध्ये पहिल्या फेसलिफ्टसह अपग्रेड झाली. तर 2020 मध्ये नवीन जनरेशन अपडेट मिळाला.
2024 मध्ये नवीन डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह क्रेटा फेसलिफ्ट लाँच झाली. आता, 2025 मध्ये क्रेटा हायब्रिडची एंट्री होणार असून त्याच वेळी क्रेटा इलेक्ट्रिकलाही अपडेट मिळेल.
ह्युंदाईने का आणले हायब्रीड तंत्रज्ञान?
ह्युंदाईने हायब्रिड मॉडेल आणण्यामागील एक मोठे कारण म्हणजे 2027 पासून लागू होणारे BS7 उत्सर्जन नियम. या नियमांमुळे वाहन उत्पादकांना कमी प्रदूषण करणाऱ्या तंत्रज्ञानाकडे वळावे लागणार आहे. हायब्रिड तंत्रज्ञान हे इलेक्ट्रिक आणि पेट्रोल इंजिनचा योग्य समतोल साधून उत्तम पर्याय ठरू शकते.
ह्युंदाई क्रेटा हायब्रिड ही ग्राहकांसाठी उत्तम मायलेज, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या बाबतीत नवीन मानदंड निर्माण करणारी एसयूव्ही ठरेल. ती इलेक्ट्रिक आणि पेट्रोलच्या तुलनेत एक स्मार्ट निवड असू शकते. विशेषतः ज्या ग्राहकांना चार्जिंगच्या समस्यांशिवाय अधिक मायलेज हवे आहे.