१३ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यामधील रुईछत्तीसी गावातील एका लॉजवर वेश्याव्यवसायाचा अवैध धंदा चालू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.त्यामुळे या बाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे हॉटेलवर छापा टाकुन ११ महिला, मुलींची सुटका करून लॉज मालकासोबतच अजून चार जणांवर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला गेला.
जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातल्या अवैध धंद्याबद्दल माहिती मिळवून त्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahmednagarlive-24-News-12.jpg)
या आदेशानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील उपनिरीक्षक तुषार पाकराव व पोलिस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश लोढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित येमुल, भाग्यश्री भिटे च उमाकांत गावडे यांची टीम तयार करुन त्यांना अवैध धंद्यांची माहिती मिळवून कारवाई करण्यासाठी टीमला पाठवले होते.
या टीम मधील उपनिरीक्षक तुपार धाकराच यांना रुईछत्तीसी मधील साई लॉज मध्ये गणेश संपत गोरे (रा. रूईछत्तीसी, ता. अहिल्यानगर) हा त्याच्या साथीदारासह कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवत आहे अशी माहिती मिळाली होती.तपास पथकाने ही माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दिली.
त्यानंतर तपास पथक इंगळे यांच्या सोबत साई लॉजवर छापा टाकण्यासाठी गेली आणि त्यांनतर पथकातील पोलिस अंमलदाराला त्यांनी बनावट ग्राहक म्हणून पाठवल्यावर या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष लॉजवर छापा टाकून शंभु उर्फ शुभम अशोक पाळंदे (वय २९, रा. मुलणमाथा, ता. राहुरी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल व १ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण २१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
साई लॉज भैय्या उर्फ गणेश संपत गोरे (रा. रूईछत्तीसी, ता. अहिल्यानगर) व त्याचा साथीदार मनोज आसाराम गावडे, (रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) हे दोघे चालवत असल्याचे सांगितले.तसेच राणा (रा.मुंबई, पूर्ण नाव माहित नाही) हा त्यांना वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवितो,अशी माहिती मिळाली.आरोपी शुभम अशोक पाळंदे याच्यासोबतच साई लॉजची पाहणी केल्यावर लॉजींग मधील रूममध्ये ११ महिला मिळून आल्या.
त्या महिलांकडे विचारपुस केल्यावर त्यांनी भैया गोरे, मनोज गावडे यांनी राणा याच्या मार्फत आम्हास वेश्या व्यवसायाकरीता आणले असल्याचे सांगितले. ते ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधुन आम्हाला पैसे देतात आणि आमच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतात.वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती त्या महिलांनी सांगितली.
या कारवाईमध्ये आरोपी भैय्या उर्फ गणेश संपत गोरे (रा. रूईछत्तीसी, ता. अहिल्यानगर, फरार), मनोज आसाराम गावडे (रा. धानोरा, ता. आष्टी, जि.बीड, फरार), शुभम अशोक पाळंदे (वय २९, रा. मुलनमाथा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), राणा (पूर्ण नाव माहित नाही, फरार) महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल भाग्यश्री मिटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.