१३ फेब्रुवारी २०२५ मुंबई : महिंद्रा बीई ६ आणि महिंद्रा एक्सईव्हीचे भव्य अनावरण नुकतेच करण्यात आले.या अनावरण सोहळ्यात गौतम मोदी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम मोदी, गौतम मोदी ग्रुपच्या संचालक निधी मोदी, लेकशोर मॉल्सचे सीपीओ सुनील श्रॉफ, विवियाना मॉलचे सेंटर हेड संदीप रे आणि महिंद्रा इलेक्ट्रिक डिव्हिजनचे झोनल बिझनेस मॅनेजर अभिषेक इनानी हे सहभागी झाले होते.
महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीने आराम, लक्झरी आणि शाश्वततेसाठी एक नवा मापदंड प्रस्थापित केला असून, भविष्यातील दळणवळणाला स्टायलिश रूप दिले आहे.महिंद्रा बीई ६ (बॉर्न इलेक्ट्रिक) हे धाडस,धडाडी आणि अमर्याद शक्यता यांचे प्रतीक आहे.ही ५-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही अत्याधुनिक डिझाइन आणि उच्च कार्यक्षमतेसह येत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahilyanagarlive-24-News-9.jpg)
यात अनेक बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत.त्यामध्ये ७९ किमी प्रतितासच्या टॉप-टियर बॅटरीसह एकाच चार्जमध्ये ६८२ किमीपर्यंतची प्रभावी रेंज आहे.त्याचप्रमाणे, महिंद्रा ईव्ही ही पुढील काळातील दळणवळणाचे एक अद्वितीय उदाहरण आहे.यामध्ये ५९ किमी प्रतितास (रेंज : ५४२ किमी) आणि ७९ किमी प्रतितास (रेंज : ६५६ किमी) असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध असून, त्यायोगे एक अप्रतिम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.