Suzlon Energy Share Price : बुधवारी अर्थातच 12 फेब्रुवारी 2025 रोजी सुजलॉन एनर्जीचे शेअर्स फोकस मध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये 2% पर्यंत वाढ होऊन तो ₹52.95 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. मागील काही महिन्यांपासून सतत घसरण झाल्यानंतर आता या शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी दिसून आली.
नवीन ऑर्डरमुळे शेअरमध्ये उत्साह
सुजलॉन एनर्जीला ऑयस्टर रिन्यूएबल्स कडून 201.6 मेगावॅटच्या नवीन विंड टर्बाइन प्रकल्पासाठी ऑर्डर मिळाली आहे. या नवीन ऑर्डरमुळे कंपनीच्या ऑर्डर बुकने 5.7 गीगावॅटचा उच्चांक गाठला आहे.
![Suzlon Energy Share Price](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Suzlon-Energy-Share-Price-1.jpeg)
गेल्या 9 महिन्यांत ऑयस्टर रिन्यूएबल्स कडून मिळालेली ही दुसरी मोठी ऑर्डर आहे. मध्य प्रदेशातील वाऱ्याच्या ऊर्जेसाठी (wind energy) हे टर्बाइन्स वापरण्यात येणार आहेत.
ब्रोकरेज कंपन्यांचा सकारात्मक दृष्टिकोन
मॉर्गन स्टॅन्ली या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्मने सुजलॉन एनर्जीच्या शेअरसाठी ₹71 चा टार्गेट प्राइस दिला आहे आणि ‘ओवरवेट’ रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेजच्या मते, कंपनीकडे मोठ्या प्रमाणात नवीन ऑर्डर्स असून FY25 आणि FY26 मध्ये या प्रकल्पांचे प्रत्यक्ष कार्यान्वयन होणार आहे.
शेअरचा परफॉर्मन्स आणि भविष्यातील दिशा
गेल्या 6 महिन्यांत : सुजलॉनचा शेअर 35% घसरला.
2025 मध्ये आत्तापर्यंत : 20% नी घसरण झाली आहे.
अलिकडच्या काही दिवसांत : शेअर किंचित सावरला असून मागील 5 ट्रेडिंग सत्रांत 6.8% ची वाढ झाली आहे.
भविष्यातील शक्यता
विश्लेषकांच्या मते, सध्या सुजलॉन एनर्जीचा शेअर ₹56.80 च्या स्तरावर आहे. जर तो या स्तरावर टिकला, तर पुढील टप्पा ₹58.50 आणि नंतर ₹61.30 पर्यंत पोहोचू शकतो. मात्र, जर तो घसरला तर ₹55.10 आणि ₹53.40 पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे ?
नवीन ऑर्डर्स आणि मोठ्या ऑर्डर बुकमुळे कंपनीचे दीर्घकालीन भविष्य सकारात्मक दिसत आहे.
शेअरमध्ये थोडी अस्थिरता राहील, त्यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांनी खबरदारी घ्यावी.
ब्रोकरेज कंपन्यांचे टार्गेट आणि तांत्रिक पातळी लक्षात घेऊन गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत.