भारतातील आघाडीची SUV मेकर कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करत असतानाच Mahindra Scorpio N Pickup Truck ची चाचणीही जोरात सुरू आहे.अलीकडेच, हा पिकअप ट्रक भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान दिसला आहे.
खरेतर हा Scorpio N ह्या SUV वरच आधारित असलेला पिकअप ट्रक असून, 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका कार्यक्रमात प्रथम दाखविण्यात आला होता.आता भारतीय बाजारपेठेत त्याचे लवकरच आगमन होण्याची शक्यता आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahilyanagarlive-24-News-12.jpg)
Mahindra Scorpio N Pickup डिझाईन
हा पिकअप ट्रक Scorpio N च्या मजबूत डिझाईन आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससह सादर केला जाईल. भारतीय रस्त्यांवर चाचणी सुरू झाल्याने, 2026 पर्यंत त्याच्या अधिकृत लॉन्चची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप महिंद्राकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
इंजिन आणि परफॉर्मन्स
Mahindra Scorpio N Pickup Truck सध्याच्या Scorpio N प्रमाणेच दमदार इंजिन पर्यायांसह उपलब्ध होणार आहे. 2.2-लीटर डिझेल इंजिन – 132 Bhp आणि 300 Nm टॉर्क तसेच 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन – 203 Bhp आणि 380 Nm टॉर्क आणि 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व 2WD आणि 4WD पर्याय उपलब्ध असतील.
फीचर्स आणि इंटीरियर
महिंद्रा स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रकमध्ये Scorpio N मधील अनेक प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, वायरलेस मोबाइल चार्जिंग, 12-स्पीकर साउंड सिस्टम, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, सहा एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम हे महत्वाचे फीचर्स असतील.
लॉन्च आणि किंमत
Mahindra Scorpio N Pickup Truck हा एक युटिलिटी व्हेईकल (Pickup Truck) असणार आहे, त्यामुळे त्याचे काही फीचर्स Scorpio N SUV पेक्षा वेगळे असू शकतात. महिंद्रा त्यात अधिक मजबूत लोडिंग क्षमता आणि ऑफ-रोडिंग क्षमतेवर भर देण्याची शक्यता आहे. महिंद्राचा हा नवीन पिकअप ट्रक दमदार इंजिन, उत्कृष्ट फीचर्स आणि जबरदस्त परफॉर्मन्ससह भारतीय बाजारपेठेत एक मोठी संधी निर्माण करेल. 2026 पर्यंत त्याच्या लॉन्चची शक्यता असल्याने, पिकअप ट्रकप्रेमींसाठी ही एक जबरदस्त संधी असणार आहे.तसेच ह्या पीकअप ट्रकची किंमत पंधरा लाख ते तीस लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे