पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार ! ‘या’ ठिकाणी तयार होणार नवा भुयारी मार्ग

या नव्या भुयारी मार्गामुळे आता पुण्यातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत होईल आणि शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास व्यक्त होतोय.

Tejas B Shelar
Published:

Pune Traffic News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न डोकं वर काढतोय. शहरात होणारी वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी भीषण समस्या बनली आहे. मात्र शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता शहरात एक नवीन भुयारी मार्ग तयार होणार आहे.

या नव्या भुयारी मार्गामुळे आता पुण्यातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत होईल आणि शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास व्यक्त होतोय.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुण्याचे दळणवळण गतिमान व्हावे यासाठी येरवडा ते कात्रज दरम्यान हा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार असून याबाबतचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बाराव्या सभेत घेण्यात आला आहे.

ही सभा आज 13 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित होते. दरम्यान आजच्या या महत्त्वाच्या सभेत एकूण १२ विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्यात २०२५-२६ च्या अर्थसंकल्पास सुद्धा मंजुरी दिली आहे. ४५९३ कोटी जमा आणि ४२९५ कोटी खर्च असा २९८ कोटी शिलकीच्या अर्थसंकल्पास आज मंजुरी देण्यात आली. पर्यटन, तीर्थक्षेत्र, औद्योगिक परिसराला जोडणाऱ्या रस्ते विकासावर भर दिला जाणार असून त्यावर १५२६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यावेळी, प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी ६३६.८४ कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करीता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी १५२६ कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे नगर रस्त्यापासून पुरंदर विमान तळाला चांगली ‘ कनेक्टिव्हिटी ‘ तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले आहेत.

खरंतर पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच वेळेवर अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे पीएमआरडीएचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिल्याने यावेळी वेळेत पीएमआरडीएचा अर्थसंकल्प सादर करण्यात यश आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe