SBI चा जबरदस्त Mutual Fund ! 2500 रुपयांची एसआयपी केल्यास मिळणार 1.18 कोटींचा परतावा

शेअर मार्केट मधील गुंतवणुक जोखीमपूर्ण असल्याने आणि सध्याची मार्केटमधील अस्थिर परिस्थिती अनेकांना घाबरवत आहे. जर तुम्हीही थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत असाल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

Published on -

SBI Mutual Fund : अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शेअर मार्केट सोबतच म्युच्युअल फंड मध्ये देखील अनेक जण गुंतवणूक करतात. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून यामुळे अनेक जण शेअर मार्केट पासून लांब झाले आहेत.

शेअर मार्केट मधील गुंतवणुक जोखीमपूर्ण असल्याने आणि सध्याची मार्केटमधील अस्थिर परिस्थिती अनेकांना घाबरवत आहे. जर तुम्हीही थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत असाल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

भारतीय म्युच्युअल फंड बाजारातील एक लोकप्रिय फंड म्हणजेचं SBI हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड. हा Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी चांगला परतावा देणारा ठरला आहे. 31 जानेवारी 2025 रोजी फंडाचा एनएव्ही (NAV) ₹462.84 होता, अन गेल्या एका वर्षात यातून 42.2% परतावा मिळाला आहे​.

फंडाची अद्ययावत कामगिरी कशी आहे?

3 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) – 24.7%
5 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) – 27.1%
सुरुवातीपासून परतावा (CAGR) – 15.9%
2024 मध्ये वार्षिक परतावा – 42.2%
2023 मध्ये वार्षिक परतावा – 38.2%

एसआयपी आणि एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा मिळालाय ?

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 25 वर्षांसाठी दरमहा ₹2500 ची एसआयपी सुरू केली असती, तर त्याचे गुंतवणुकीचे मूल्य 1.18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असते.
त्याच वेळी, जर ₹1 लाखाची एकरकमी गुंतवणूक 5 वर्षांपूर्वी केली असती, तर ती आज ₹3.5 लाखांवर पोहोचली असती.

फंडाच मुख्य गुंतवणूक क्षेत्र

SBI हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड हा फार्मा आणि हेल्थकेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा एक क्षेत्रनिहाय फंड (Sectoral Fund) आहे. सध्या, फंडातील 90% गुंतवणूक हेल्थकेअर सेक्टरमध्ये आहे. Sun Pharmaceuticals (13%), Max Healthcare (6%), Divi’s Laboratories (6%), Cipla Ltd (6%) अन Lupin Ltd (5%)​ यांसारख्या कंपन्यांमध्ये या म्युच्युअल फंडची गुंतवणूक आहे.

एसबीआय हेल्थकेअर फंड गुंतवणुकीसाठी योग्य का ?

हा फंड गेल्या 5 वर्षांत स्थिर आणि उच्च परतावा देत आहे. हा फंड भारतातील आणि आंतरराष्ट्रीय फार्मा उद्योगातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. हेल्थकेअर सेक्टर हा नेहमीच वाढीच्या संधी असलेला क्षेत्र मानला जातो. मात्र असे असले तरी कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरणार आहे. गुंतवणुकीपूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे नेहमीच चांगले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe