साकूरच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला ‘तो’ नवस फेडला आ. खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत !

Mahesh Waghmare
Published:

१४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : तालुक्यात सत्ता परिवर्तन होऊन महायुतीचे अमोल खताळ आमदार व्हावेत यासाठी साकुर पठार भागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साकुरच्या बिरोबा महाराजांकडे नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो आ. खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फेडण्यात आला.

यासाठी आ.खताळ साकुर येथे पोहोचताच त्यांची बस स्थानकापासून विरभद्र बिरोबा महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.त्यांनी बिरोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वक्ता सेलच्या उपाध्यक्षा अमृता कोळपकर आणि महायुतीचे सुभाष पेंडभाजे यांच्या वतीने शेरणी वाटप करण्यात आले.भीमराज जाधव व गंगाराम खेमनर यांनी पेढे वाटप करून आ. खताळ यांच्या उपस्थितीत नवस फेडला.

या वेळी पठार भागातील भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, गुलाब भोसले, रऊफ शेख इसाक पटेल, अझर पटेल, भीमराव जाधव, मच्छिद्र खेमनर, भाऊ डोंगरे, अनिल कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते.आ. खताळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील विजय हा माझा एकट्याचा नसून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटीबद्ध राहील, तसेच साकुर पठार भागातील पाण्याचा ज्वलंत प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe