१४ फेब्रुवारी २०२५ श्रीगोंदा : विधान परिषद सभापतिपदी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेतकरी व महिला बचतगट मेळावा झाला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते.ते म्हणाले, की वेळ बदलत असते.पूर्वी आपण आणि श्रीगोंदेकरांनी संघर्ष केला.
आता पाटपाण्याचे प्रश्न सोडवू, शासकीय नोकरी मिळाली की नोकरवर्ग कुटुंबापुरता विचार करतो, पण विठ्ठलराव वाडगे यांनी ग्रामसेवक पदाच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन धार्मिक, तसेच शेतकरी हिताच्या योजना राबवून श्रीगोंद्याच्या विकासात योगदान दिले,संत नामदेव महाराजांचे १८वे वंशज ज्ञानदेव तुळशीदास महाराज नामदास म्हणाले, की प्रा. शिंदे यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे यश मिळवत चांगले काम केले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahilyanagarlive-24-News-24.jpg)
”मी आता योग्य जागी बसलो आहे.आपल्या जिव्हाळ्याचा कुकडी प्रकल्प माझा आवडता विषय आहे.पूर्वी प्रकल्पाच्या वरच्या भागातील नेते अध्यक्ष असायचे,आपण खालच्या भागात होतो पण आता परिस्थिती बदलली आहे.आता मी सभापती आहे त्यामुळे कोणीच काळजी करू नका” असे म्हणत डिंभे-माणिकडोह बोगद्याचा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला आ. विक्रम पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे, संत बाबा महाहंसजी महाराज, अॅड. प्रदीप खामगळ, शहाजी हिरवे, चैतन्य महिला बचतगटांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन रुक्मिणी वाडगे, शुभम वाडगे, अजय गावडे, सायली वाडगे, मेघना गावडे आदी उपस्थित होते.