Small Business Idea : आजच्या घडीला व्यवसाय करणे हे नोकरीच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरत आहे. जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. कमी भांडवलात सुरू करता येणारे काही छोटे उद्योग मोठा नफा मिळवून देऊ शकतात. आज आम्ही अशाच काही व्यवसायांची माहिती घेऊन आलो आहोत, जे अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करता येतील.
मधाचा व्यवसाय : तुमच्याजवळ 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत भांडवल असल्यास, मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरू शकते. बाजारात विविध ब्रँडचे मध उपलब्ध असले, तरी ग्राहक शुद्धतेला प्राधान्य देतात.

जर तुम्ही उत्तम दर्जाचा मध विक्रीस उपलब्ध करून दिला, तर हा व्यवसाय नक्कीच चांगला नफा मिळवून देईल. सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता, हा व्यवसाय भविष्यात अधिक लाभदायक ठरू शकतो.
दुधाचा व्यवसाय : कमी खर्चात जास्त नफा हवा असेल तर तुम्ही दुधाचा व्यवसाय सुरू करायला काही हरकत नाही. ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये गाय किंवा म्हैस पाळली जाते. जर तुमच्याजवळ गाय किंवा म्हैस नसेल,
तर ती तुम्ही साधारणतः 30,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जर तुमच्याजवळ आधीच दुधाळ जनावर असेल, तर अवघ्या 50,000 रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
केवळ दूध विकण्यापुरतेच नव्हे, तर तुम्ही दही, लस्सी, पनीर, आईस्क्रीम आणि मिठाई यांसारखे पदार्थ तयार करूनही चांगला नफा मिळवू शकता. योग्य व्यवस्थापन केल्यास महिन्याला भरघोस उत्पन्न मिळू शकते.
वृक्ष लागवड : जर तुमच्याजवळ पुरेशी जमीन असेल, तर वृक्ष लागवड हा दीर्घकालीन पण हमखास नफा देणारा व्यवसाय आहे. शिसम आणि सागवान यांसारखी झाडे लावून तुम्ही 8 ते 10 वर्षांमध्ये लाखोंचा फायदा मिळवू शकता.
सध्या शिसम झाडाची किंमत साधारणतः 40,000 रुपये आहे, तर सागवान याहून अधिक महाग विकले जाते. त्यामुळे योग्य नियोजन करून हा व्यवसाय केल्यास भविष्यात मोठे उत्पन्न मिळवता येईल.
फुलांचा व्यवसाय : फुलांचा व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत दररोज चांगले उत्पन्न मिळवून देणारा आहे. सध्याच्या काळात बर्थडे पार्टी, बेबी शॉवर आणि इतर समारंभांमध्ये फुलांच्या सजावटीला मोठी मागणी आहे.
तसेच, बहुतांश लोक दररोज देवपूजेसाठी ताजी फुले घेतात. त्यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, तर सतत ग्राहक मिळण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यामुळे तुमच्या कमाईत सातत्य राहू शकते.