Suzlon Share Price : आज व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसली. आज शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली अन यामुळे सध्या शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच आता शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे.
खरेतर, आज बीएसई सेन्सेक्स 194.68 अंकांनी घसरून 75,944.29 वर पोहोचला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 80.65 अंकांनी घसरून 22,950.75 वर स्थिरावला. शेअर बाजाराच्या या घसरणीच्या काळात सुझलॉन कंपनीचे स्टॉक सुद्धा घसरले आहेत.

सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरची कामगिरी
आजच्या ट्रेडिंग सत्रात सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर -2.79% टक्क्यांनी घसरून 51.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉकची आजची दिवसाची सुरुवात 53.55 रुपयांपासून झाली असून, शेअरने 53.88 रुपयांचा उच्चांक गाठला, तर दिवसातील नीचांकी स्तर 51.30 रुपये राहिला.
52 आठवड्यांचा उच्चांक अन निचाँक
सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 86.04 रुपये राहिला अन नीचांकी स्तर 35.50 रुपये राहिला. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 70,327 कोटी रुपये आहे. या कंपनीवर सध्याच्या घडीला 277 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
शेअरची मागील पाच वर्षांमधील कामगिरी
सुझलॉनच्या शेअरमध्ये मागील 5 दिवसात -4.23%, मागील 1 महिन्यात -9.22%, तर 6 महिन्यात -32.30% टक्क्यांची घसरण झाली आहे. तथापि, मागील 1 वर्षात हा शेअर 12.86% वाढला आहे. YTD आधारावर या स्टॉकमध्ये -20.45% घट झाली असून, हा स्टॉक 5 वर्षांत -2,363.03% इतका घसरला आहे.
ब्रोकरेजचा सल्ला काय
12 पैकी 7 विश्लेषकांनी स्ट्रॉंग बाय रेटिंग दिली आहे अन पाच विश्लेषकांनी बाय रेटिंग दिली आहे. यासाठी अवरेज 72.14 रुपयांचे टारगेट प्राईस निश्चिय करण्यात आले आहे. पण, सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठे चढ-उतार होत असून, अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बाजारातील अनिश्चितता लक्षात घेऊन योग्य धोरण आखणे महत्वाचे ठरेल.