1 कोटीचं Home Loan हवं असेल तर तुमचा मासिक पगार अन Cibil Score किती असायला हवा ? पहा….

अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे सर्वसामान्य जनता होम लोन घेऊनच आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करते. दरम्यान जर तुम्हीही HDFC बँकेकडून गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.

Published on -

Home Loan Rule 2025 : मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या आर्थिक स्थैर्याचा योग्य आढावा घेणे महत्त्वाचे आहे. HDFC बँकेकडून 1 कोटी रुपयांचे वैयक्तिक कर्ज किंवा गृहकर्ज मिळवण्यासाठी मासिक पगार आणि CIBIL स्कोर किती असावा, याबाबत जाणून घेऊयात.

खरंतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे सर्वसामान्य जनता होम लोन घेऊनच आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करते. दरम्यान जर तुम्हीही HDFC बँकेकडून गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की आज आपण एचडीएफसी बँकेकडून एक कोटी रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल तर मासिक पगार किती असायला हवा आणि यासाठी सिबिल स्कोर किती हवा याचा एक आढावा घेणार आहोत.

1 कोटींचे कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक अटी

HDFC बँकेकडून कर्ज मंजूर करण्यासाठी अर्जदाराची उत्पन्न क्षमता, क्रेडिट स्कोर आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता या प्रमुख बाबींचा विचार केला जातो.

मासिक पगार किती असावा?

वैयक्तिक कर्जासाठी : मासिक उत्पन्न किमान 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असावे.
गृहकर्जासाठी : पगाराच्या आधारावर ही रक्कम ठरते, पण 1 कोटींचे गृहकर्ज मिळवण्यासाठी मासिक उत्पन्न 1.5 लाख ते 2 लाख रुपये किंवा अधिक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा 21 ते 60 वर्षे असावी.
नोकरीत स्थिरता आवश्यक असून अर्जदार किमान 2-3 वर्षे नोकरीत असावा.

CIBIL स्कोर किती असावा?

HDFC बँकेच्या निकषांनुसार, 750 किंवा त्याहून अधिक CIBIL स्कोर असणाऱ्या ग्राहकांना कर्ज मंजुरीसाठी चांगली संधी असते. CIBIL स्कोर 700 ते 749 दरम्यान असल्यास, बँक कर्ज मंजूर करू शकते, परंतु व्याजदर अधिक लागू शकतो. 700 पेक्षा कमी CIBIL स्कोर असल्यास कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते.

कर्ज मिळवताना अन्य महत्त्वाच्या गोष्टी

अर्जदाराच्या महिन्याच्या पगाराच्या तुलनेत EMI किती असेल, हे ठरवले जाते. सहसा, EMI उत्पन्नाच्या 40-50% पर्यंत मर्यादित असतो. अर्जदाराकडे जर अन्य कर्जे असतील, तर त्याचा देखील विचार केला जातो.

स्थिर नोकरी, उत्पन्नाचा नियमित स्त्रोत, आणि चांगला क्रेडिट इतिहास असलेल्या अर्जदारांना कर्ज मंजुरी लवकर मिळते. आता आपण एक कोटी रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो याबाबत माहिती पाहूयात.

1 कोटीच्या गृह कर्जासाठी किती रुपयांचा मासिक हप्ता?

जर एखाद्या ग्राहकाला 1 कोटी 20 हजार 247 रुपयांचे होम लोन 8.75% दराने 20 वर्षांसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 88 हजार 550 रुपये मासिक हफ्ता भरावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!