मुकेश अंबानीच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक 1827 रुपयांवर जाणार ! तज्ञ सांगतात Reliance चा स्टॉक आत्ताच खरेदी करा

शेअर बाजारातील या घसरणीच्या काळात रिलायन्स समूहाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थातच आरआयएलच्या स्टॉकमध्ये देखील आज घसरण दिसली आहे. आज, बीएसई सेन्सेक्स 551.71 अंकांनी घसरून 75,587.26 वर पोहोचला असून, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 205.35 अंकांनी घसरून 22,826.05 वर स्थिरावला आहे.

Published on -

Reliance Share Price : भारतीय शेअर बाजारात आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मोठी घसरण दिसून आली आणि यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक निफ्टी मध्ये आज मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरलेली आहे.

दरम्यान शेअर बाजारातील या घसरणीच्या काळात रिलायन्स समूहाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थातच आरआयएलच्या स्टॉकमध्ये देखील आज घसरण दिसली आहे. आज, बीएसई सेन्सेक्स 551.71 अंकांनी घसरून 75,587.26 वर पोहोचला असून, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 205.35 अंकांनी घसरून 22,826.05 वर स्थिरावला आहे.

या घसरणीचा प्रभाव रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या शेअरवर देखील दिसून आला. आज ट्रेडिंग सुरु होताच रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1,219.00 रुपयांवर उघडला होता. मात्र, दिवसभरातील व्यापारात त्याने 1,224.00 रुपयांचा उच्चांक गाठला आणि 1,205.45 रुपयांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला.

सध्या हा शेअर -0.33% टक्क्यांनी घसरून 1,212.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. अशा परिस्थितीत आज आपण शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्टॉकची गेल्या काही वर्षांमधील कामगिरी आणि या स्टॉकबाबत तज्ञांकडून काय सल्ला दिला जात आहे याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची 52 आठवड्यांची कामगिरी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,608.80 रुपये होती, तर नीचांकी पातळी 1,193.35 रुपये आहे. मागील 30 दिवसांमध्ये कंपनीच्या सरासरी 88,71,404 शेअर्सची देवाण-घेवाण झाली आहे. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 16,37,417 कोटी रुपये असून, P/E रेशो 23.6 आहे. कंपनीवर सध्या 3,57,525 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.

स्टॉकने गुंतवणूकदारांना किती परतावा दिलाय

गेल्या 5 दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर -3.57% ने घसरला आहे, तर मागील 1 महिन्यात यात -2.06% घट दिसून आली आहे. 6 महिन्यांत हा शेअर -17.01% ने घसरला असून, मागील 1 वर्षात त्यात -18.10% टक्क्यांची घसरण झाली आहे. YTD (Year-to-Date) आधारावर कंपनीचा शेअर -0.66% टक्क्यांनी घसरला आहे.

मात्र, मागील 5 वर्षांत कंपनीच्या शेअरने 64.65% ची वाढ पाहायला मिळाली आहे. अर्थातच गेल्या पाच वर्षांमध्ये कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना समाधानकारक रिटर्न या ठिकाणी दिलेले आहेत. मात्र लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर 4,476.39% टक्क्यांनी घटला आहे.

ब्रोकरेज फर्मचा अंदाज आणि टार्गेट प्राईस

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला ओव्हरवेट रेटिंग देत 1,520 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. किरकोळ क्षेत्रातील विस्तार आणि दूरसंचार शुल्क वाढीच्या संभाव्यतेमुळे कंपनीला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, उपकंपन्यांच्या संभाव्य सूचीकरणामुळे कंपनीच्या मूल्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुढील काही तिमाहींसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची स्थिती कशी राहील, याकडे बाजार विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News