Ahilyanagar News : गोरगरीब व आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी शासनाकडून भरमसाठ निधीची तरतूद करण्यात येते. तो निधी आवश्यक कामासाठी वापरुन निधी योग्य योग्य त्या ठिकाणी वापरूनत्याचा सदुपयोग करण्यापेक्षा त्या निधीतून आपला कसा फायदा होईल याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसत असल्याचे दिसुन येते आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असर्णाया आदिवासी आश्रमशाळेचे चित्र तर अतिशय विदारक आहे.
पारनेर तालुक्यातील पळशी येथील ग्रामीण भागातील आदिवासी मुला-मुलींसाठी असणाऱ्या निवासी आश्रम शाळेत विविध गैरप्रकार सुरू होते. चाललेल्या या गैरप्रकाराबाबत हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर आमदार काशिनाथ दाते यांनी या आश्रम शाळेविषयी चाललेल्या गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली होती.

या प्रकरणाविषयी शासनामार्फत समिती स्थापन करून शासनाला अहवाल देण्यात आला यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका या दोषी आढळल्याने आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुंडलिक नागरगोजे यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुढील आदेश येईपर्यंत मुख्याध्यापिका सविता कुंडलिक नागरगोजे यांच्याविरोधात नाशिकचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी निलंबनाचा बडगा उगारला आहे.
मुख्याध्यापिकेचे निलंबित झाल्याने आश्रमशाळा तसेच वसतिगृहांच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पळशी येथील आश्रम शाळेतील गैरप्रकारांबाबत हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या त्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था, मुलांना खाण्यासाठी आणलेले फळे पालेभाज्या हे खराब असून मुलांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर सदरची कारवाई करण्यात आली आहे.