चक्क ‘या’ अधिकाऱ्यासमोरच तुफान हाणामारी ; एकाच व्यक्तीला मारण्यासाठी तिघे तुटून पडले…

Mahesh Waghmare
Published:

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर  महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्यावरुन अतिक्रमण पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोरच तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील नागापूर येथे १३ फेब्रुवारी रोजी घडली.

एमआयडीसी परिसरात नगर ते मनमाड रोड लगत नवनागापूर भाजी बाजारमुळे वाहतुक कोंडी समस्या अनुषंगाने उपाय योजना तसेच मनमाड रोडचे बाजुचे अतिक्रमणमुळे होणारी वाहतूक कोंडी यावरील उपाय योजना अनुषंगाने रोडचे दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढण्याची मोहीम एमआयडीसी प्रशासनाने १३ फेब्रुवारीला राबविली.या वेळी पोलिस बंदोबस्तही तैनात होता.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरच प्रांताधिकारी, तहसीलदार हे ही उपस्थित होते.सदर मोहीम सुरु असताना नवनागापूर येथे अतिक्रमण हटविण्यात येत असताना त्या कर्मचाऱ्यांना संकेत किसन भिंगारदिवे (रा. भिंगारदिवेमळा, नगर) याने अविनाश जाधव यांची टपरी अगोदर काढून घ्या असे म्हटले.

यावर अविनाश जाधव यांनी अतिक्रमण काढणारे अधिकारी त्यांचे काम करतील तू मध्ये बोलू नकोस असे म्हटल्याने संकेत भिंगारदिवे यास राग आला त्याने किसन भिंगारदिवे व आदेश भिंगारदिवे यांच्या मदतीने अविनाश जाधव यास शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व दोघांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

याप्रकरणी अविनाश बाबुराव जाधव (वय ३५, रा. बोल्हेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी संकेत किसन भिंगारदिवे, किसन भिंगारदिवे, आदेश भिंगारदिवे यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe