Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ कासार पिंपळगाव : महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.मात्र अद्याप कर्जमाफीची घोषणा केलेली नाही.
त्यामुळे सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाने मासिक बैठकीत सभासदांची पीक कर्जाची वसुली न करण्याचा ठराव संमत करावा,अशी मागणी क्रांती शेतकरी संघटना पाथर्डी तालुका अध्यक्ष सचिन म्हस्के यांनी केली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/15-1.jpg)
काही सहकारी सेवा सोसायट्यांनी सभासदांना पीक कर्जाच्या वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत.
तसेच सभासदांकडून पीककर्ज भरून घेतले जात असल्याचेही दिसते.सोसायटीने पीक कर्जाची थकबाकी वसूल केली आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने कर्जमाफी जाहीर केली,
तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल.तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल असे यावेळी शेतकऱ्यांचे मत आहे.