5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung चा नवा 5G फोन! लॉन्चपूर्वीच चर्चेत!

Karuna Gaikwad
Published:

स्मार्टफोनच्या जगात Samsung Galaxy A36 5G लवकरच धमाकेदार एंट्री करणार आहे. सॅमसंगच्या A सीरिज मधील हा नवा फोन अनेक दमदार फीचर्स आणि नवीन डिझाइनसह बाजारात झळकणार आहे. अद्याप कंपनीने याच्या लाँचिंग बाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी टिपस्टर इव्हान ब्लासने या फोनचा 360-डिग्री व्ह्यू शेअर केला आहे. यामुळे फोनच्या लूक आणि डिझाइन बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सॅमसंगच्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो वायब्रंट व्हिज्युअल आणि उत्कृष्ट ब्राइटनेस प्रदान करेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास विक्टस प्लस प्रोटेक्शन सह येण्याची शक्यता आहे.

प्रोसेसिंग पॉवरसाठी या फोनमध्ये Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अत्यंत प्रभावी ठरेल. तसेच, हा फोन Android 14 वर आधारित One UI 6.1 ऑपरेटिंग सिस्टमसह येण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy A36 च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Galaxy A56 प्रमाणेच आकर्षक दिसत आहे. याच्या मागील बाजूस तीन कॅमेऱ्यांचा वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. कॅमेरा मॉड्यूलच्या बाजूला एक LED फ्लॅश देखील दिसत आहे. टिपस्टरने शेअर केलेल्या लीकनुसार, फोन मल्टीपल कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल.

सॅमसंगने आपल्या A36 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, जी दीर्घकाळ टिकणारी असेल. या बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे, ज्यामुळे फोन काही मिनिटांतच चार्ज होईल.

या स्मार्टफोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाणार आहे, जो जलद अनलॉकिंग अनुभव देईल. तसेच, दमदार साऊंडसाठी स्टिरिओ स्पीकर्स उपलब्ध असतील. हा फोन IP67 वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह येईल, त्यामुळे हलक्या पाण्याच्या थेंबांपासून तो सुरक्षित राहील.

Samsung Galaxy A36 5G मार्च 2025 च्या मध्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. अद्याप याच्या किंमतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि, हा स्मार्टफोन ₹30,000 ते ₹35,000 च्या किंमत श्रेणीत सादर केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A36 च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Galaxy A56 प्रमाणेच आकर्षक दिसत आहे. याच्या मागील बाजूस तीन कॅमेऱ्यांचा वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. कॅमेरा मॉड्यूलच्या बाजूला एक LED फ्लॅश देखील दिसत आहे. टिपस्टरने शेअर केलेल्या लीकनुसार, फोन मल्टीपल कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe