77 पैशांचा ‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! यापूर्वी गुंतवणूकदारांना दिलाय 2466% परतावा

Tejas B Shelar
Published:

Penny Stocks : शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये आपले तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तसेच काही कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हीडंट देण्याची मोठी घोषणा सुद्धा करण्यात आली आहे.

त्यामुळे सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण असून अनेक कंपन्यांचे स्टॉक्स विक्रमी भाव पातळीवर ट्रेड करत आहेत. दरम्यान, भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा दिला आहे.

शेअर बाजारात सूचीबद्ध असणारे अनेक पेनी स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले असून कमी किमतीच्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करून अनेक जण लखपती झाले आहेत.

यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार नेहमीच अशा पेनी स्टॉकच्या शोधात असतात. म्हणूनच आज आपण अशा एका पेनी स्टॉकची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये हजारो टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

कोणता आहे तो स्टॉक

आम्ही ज्या स्टॉक बाबत बोलत आहोत तो आहे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सचा शेअर. या कंपनीच्या शेअरचा भाव काल अर्थातच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 0.77 रुपये प्रति शेअर होता, जो मागील बंद शेअर्सच्या तुलनेत किंचित कमी होता. कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी 0.80 रुपये आणि उच्चांकी 3.52 रुपयांवर व्यवहार करत आहे.

गुंतवणूकदारांना मोठा परतावा

बीएसई अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या विश्लेषणानुसार, स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 2400 टक्क्याहून अधिकचा प्रताप दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या स्टॉकने गेल्या वर्षभरात या शेअरने 72 टक्के, तर मागील तीन वर्षात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 850% आणि मागील पाच वर्षात 1429% इतका परतावा दिला आहे.

तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना 2,466% परतावा दिला आहे. एकंदरीत 77 पैशांचा हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा देताना दिसतोय. यामुळे नेहमीच हा स्टॉक चर्चेत राहतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe