Bonus Share | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ कंपनीकडून 1:1 बोनस शेअर जाहीर, रेकॉर्ड डेट नोट करा

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत तसेच काही कंपन्या बोनस शेअरची घोषणा करत आहेत आणि काही कंपन्या डिव्हिडेंड वाटपाची घोषणा करत आहेत. यामुळे सध्या शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.

Published on -

Bonus Share : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेषतः जे गुंतवणूकदार बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत तसेच काही कंपन्या बोनस शेअरची घोषणा करत आहेत आणि काही कंपन्या डिव्हिडेंड वाटपाची घोषणा करत आहेत.

यामुळे सध्या शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. दरम्यान, शेअर बाजारातील अशाच एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे.

या कंपनीने केली बोनस शेअरची घोषणा

कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेड (Kothari Products Ltd) कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स साठी 1:1 बोनस शेअर जाहीर केला आहे. म्हणजेच, प्रत्येक गुंतवणूकदाराला एका शेअरवर एक अतिरिक्त शेअर विनामूल्य मिळणार आहे. या बोनस इश्यूसाठी 18 फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना बोनस शेअर्सचा लाभ मिळेल.

कोठारी प्रोडक्ट्सच्या बोनस इश्यूचा इतिहास

बीएसई (BSE) च्या नोंदीनुसार, कंपनीने यापूर्वी दोन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. 2014 मध्ये कंपनीने पहिल्यांदा बोनस जाहीर करत 2 रुपये प्रति शेअर लाभांश (डिव्हिडेंड) दिला होता. 2016 मध्ये दुसऱ्यांदा बोनस इश्यू आणताना कंपनीने 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर दिला होता.

डिव्हिडेंड वाटपाचा इतिहास

बोनस व्यतिरिक्त, कोठारी प्रोडक्ट्सने वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडेंडही दिला आहे. 2019 मध्ये शेवटचा डिव्हिडेंड देण्यात आला होता, त्यावेळी प्रति शेअर 1 रुपया लाभांश देण्यात आला होता. याआधीही कंपनी नियमितपणे आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देत होती.

शेअर बाजारातील कामगिरी

गेल्या एका वर्षात कोठारी प्रोडक्ट्सच्या शेअरच्या किमतीत 21% वाढ झाली आहे, तर याच कालावधीत सेंसेक्समध्ये 5.73% वाढ नोंदवली गेली. म्हणजेच कंपनीची गेल्या एका वर्षाचे कामगिरी समाधानकारक आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

दरम्यान, बोनस शेअरची घोषणा केल्यानंतरही शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.23% घसरणीसह 176.80 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा 52 आठवड्याचा उच्चाँक 227.35 रुपये आणि 52 आठवड्याचा निचाँक 111.15 रुपये इतका राहिला आहे.

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी !

कोठारी प्रोडक्ट्स लिमिटेडच्या या घोषणेमुळे गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळण्याची संधी आहे. आगामी काळात या शेअरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याने, गुंतवणूकदारांनी ही सुवर्णसंधी साधण्याचा विचार करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe