Dividend Stock : शेअर बाजारातील अस्थिरतेतही गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सूचीबद्दल असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तिमाही निकाला सोबतच काही कंपन्यापूर्ण शेअरची घोषणा करत आहेत आणि काही कंपन्या डिव्हीडेंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत.
दरम्यान आज आपण अशाच काही कंपन्यांची माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. मंडळी सध्या शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार सुरु आहे, मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येत असले तरी काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना खुश करणार आहेत. काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश (Dividend) देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहेत.

या आठवड्यात अनेक कंपन्या एक्स-डिव्हीडेंड, एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिट ट्रेड करणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी असू शकते. दरम्यान आता आपण कोण कोणत्या दिवशी कोणकोणत्या कंपन्या एक्स-डिव्हीडेंड, एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिट ट्रेड करणार याचा एक आढावा घेऊयात.
17 फेब्रुवारीला एक्स-डिव्हीडेंड ट्रेड करणाऱ्या कंपन्या
मिळालेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारी 2025 रोजी कॅम्पस ऍक्टिव्हवेअर लिमिटेड, डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज, गरुड़ कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग, IRCON इंटरनॅशनल, ऑइल इंडिया लिमिटेड, प्रेमको ग्लोबल लिमिटेड या कंपन्या एक्स-डिव्हीडेंड ट्रेड करणार आहेत.
17 आणि 18 फेब्रुवारीला या कंपन्यांचे शेअर्स स्प्लिट होणार
मिळालेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारी रोजी कॅपिटल इंडिया फायनान्स लिमिटेडचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. म्हणजेच या दिवशी ही कंपनी एक्स-स्प्लिट ट्रेड करणार आहे. तसेच 18 फेब्रुवारी 2025 रोजी कोनार्ट इंजिनियरिंग लिमिटेड ही कंपनी एक्स-स्प्लिट ट्रेड करणार आहे. अर्थातच स्प्लिट शेअर्ससाठी ही रेकॉर्ड राहणार आहे.
18 फेब्रुवारीला कोणत्या कंपन्या एक्स-डिव्हीडेंड ट्रेड करणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांनी अर्थातच 18 फेब्रुवारी 2025 रोजी भारत फोर्ज लिमिटेड, सेव्हन टेक्नोलॉजीज, होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्स लिमिटेड, IOL केमिकल अँड फार्मास्युटिकल्स, केपी ग्रीन एनर्जी लिमिटेड, केपीआई ग्रीन एनर्जी लिमिटेड, ग्रीन पॅनल इंडस्ट्रीज लिमिटेड, केएसई लिमिटेड, नाटको फार्मा लिमिटेड, एनबीसीसी इंडिया लिमिटेड, एनसीएल इंडस्ट्रीज, सरस्वती साडी डिपो लिमिटेड यासारख्या कंपन्या एक्स-डिव्हीडेंड ट्रेड करणार आहेत.
18 फेब्रुवारीला या 2 कंपन्या बोनस शेअर्स देणार
या आठवड्यात गुजरात टूलरूम लिमिटेड आणि कोठारी प्रॉडक्ट्स लिमिटेड आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहेत. यासाठी 18 फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट ठरवण्यात आली आहे.
20 फेब्रुवारी रोजी कोणत्या कंपन्या एक्स-डिव्हीडेंड ट्रेड करणार ?
20 फेब्रुवारी 2025 रोजी AVT नेचुरल प्रॉडक्ट्स, IRCTC, शिवालिक बायमेट कंट्रोल्स लिमिटेड आणि P&G एक्स-डिव्हीडेंड ट्रेड करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
21 फेब्रुवारी रोजी कोणत्या कंपन्या एक्स-डिव्हीडेंड ट्रेड करतील ?
21 फेब्रुवारी 2025 रोजी बॉम्बे बुमराह ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, कॅंटाबिल रिटेल इंडिया लिमिटेड, कॅरियर पॉइंट लिमिटेड, फर्स्टसोर्स सोल्युशन्स इंडिया लिमिटेड, निप्पॉन इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, मण्णापुरम् फायनान्स, मीरा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि SJVN लिमिटेड एक्स-डिव्हीडेंड ट्रेड करणार आहेत.
गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावे?
खरंतर, आम्ही वर सांगितलेल्या या सर्व कंपन्यांचे स्टॉक सध्या फोकस मध्ये आहेत. बोनस शेअर, डिव्हीडेंड अन स्टॉक स्प्लिट करणाऱ्या कंपन्या फोकस मध्ये आल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवस शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी नक्कीच उत्साहवर्धक राहणार आहेत.
पण, बोनस शेअर्स, डिव्हीडेंड मिळवण्यासाठी संबंधित शेअर्स एक्स-डिव्हीडेंड होण्याच्या आधी खरेदी करणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे, एक्स-बोनस किंवा एक्स-स्प्लिट स्टेटस असलेल्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरू शकतात. त्यामुळे शेअर बाजारात सध्याच्या अस्थिरतेतही योग्य नियोजन करून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.