‘हे’ आहेत 3 वर्षात 12 % पेक्षा जास्त परतावा देणारे 6 Mutual Fund ; HDFC बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड आघाडीवर !

गेल्या तीन वर्षांत काही डायनॅमिक असेट अलोकेशन फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना 12% पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. हे फंड इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये गतिशीलपणे गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांना मार्केटच्या चढ-उतारांनुसार गुंतवणुकीत बदल करण्याचे स्वातंत्र्य असते.

Published on -

Best Mutual Fund : तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. खरेतर, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदार अनेकदा भूतकाळातील परताव्यांचा विचार करतात. हे परतावे जरी भविष्यातील नफ्याची खात्री देत नसले, तरी ते त्या फंडाच्या संभाव्य कामगिरीचा अंदाज घेण्यासाठी महत्त्वाचे असतात.

म्हणूनच आज आपण गेल्या तीन वर्षात ज्या म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे त्या फंडाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या तीन वर्षांत काही डायनॅमिक असेट अलोकेशन फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना 12% पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. हे फंड इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये गतिशीलपणे गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांना मार्केटच्या चढ-उतारांनुसार गुंतवणुकीत बदल करण्याचे स्वातंत्र्य असते.

डायनॅमिक असेट अलोकेशन फंड म्हणजे काय ?

हे फंड त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण बाजारातील परिस्थितीनुसार बदलतात. त्यांची इक्विटी व डेटमधील गुंतवणूक 0% ते 100% पर्यंत असू शकते. सध्या अशा 34 योजनांमध्ये एकूण ₹2.82 लाख कोटींची संपत्ती (AUM) आहे, तर जानेवारीमध्येच या फंडांमध्ये ₹1,512 कोटींची नवीन गुंतवणूक करण्यात आली आहे.

3 वर्षांत उच्च परतावा देणारे टॉप डायनॅमिक असेट अलोकेशन फंड

HDFC Balanced Advantage Fund : याने गेल्या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 19.42% दराने वार्षिक परतावा दिला आहे. म्हणून हा फंड या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो. HDFC Balanced Advantage Fund, जो ₹92,084 कोटींच्या AUM सह बाजारात वर्चस्व गाजवत आहे.

SBI Balanced Advantage Fund : HDFC Balanced Advantage Fund नंतर SBI Balanced Advantage Fund चा नंबर लागतो. हा फंड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येत असून याने गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 12.53% परतावा दिला आहे. ₹32,936 कोटी AUM असलेला SBI Balanced Advantage Fund दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Bank of India Balanced Advantage Fund : हा फंड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येत असून गेल्या तीन वर्षात याने आपल्या गुंतवणूकदारांना 12.44 टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. याचे AUM 128 कोटी इतके आहे.

Axis Balanced Advantage Fund : हा फंड या यादीत चौथ्या क्रमांकावर येत असून गेल्या तीन वर्षात याने आपल्या गुंतवणूकदारांना 12.24 टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. याचे AUM 2661 कोटी इतके आहे.

Invesco India Balanced Advantage Fund : यांनी गेल्या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 11.75 टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. म्हणून या यादीत हा फंड पाचव्या क्रमांकावर येतो. याचे AUM 949 कोटी इतके आहे.

Nippon India Balanced Advantage Fund : या फंडाने गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 11.35% दराने वार्षिक परतावा दिला आहे. याचे AUM 8646 कोटी इतके आहे. या यादीत हा फंड सहाव्या क्रमांकावर आहे.

तथापि, गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की भूतकाळातील परतावा भविष्यातील नफ्याची हमी देत नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या निर्णयाआधी विविध घटकांचा विचार करून योग्य फंड निवडणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe